Breaking News

महाराष्ट्राचा रिमोट हाती येणार, आदित्य ठाकरेंचा पराभव करणार : अभिजीत बिचुकले

मुंबई
फक्त मुंबईचाच नाही तर महाराष्ट्राचा रिमोट हाती घेणार आणि आदित्य ठाकरेंचा वरळीत पराभव करणार असा विश्‍वास वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात अर्ज दाखल केेलेल्या अभिजीत बिचुकलेंनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांनी मला बिग बॉसमध्ये ज्याप्रमाणे साथ दिली अगदी तशीच साथ मुंबईकर मला मतदानादरम्यान देतील असंही अभिजीत बिचुकलेने म्हटलं आहे. कोल्हापुरात अभिजीत बिचुकलेने अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना मुंबईकर मला नक्की निवडून देतील असं अभिजित बिचुकलेनं म्हटलं आहे.
प्रचारासाठी तुमची रणनीती काय असं विचारलं असता, चिन्ह आल्यावर मी या सगळ्या गोष्टी स्पष्ट करेन असं अभिजीत बिचुकलेंनी सांगितलं. वरळीत सध्या ठाकरेेंची हवा आहे याबाबत विचारलं असता आपण हवा निर्माण करत नाही हवा काढून घेतो असंही बिचुकले म्हणाले. माझ्यामुळे वरळीची निवडणूक रंगतदार झाली आहे. मी आज महालक्ष्मीच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे असंही त्यांनी सांगितलं.