Breaking News

औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएममध्ये जुंपली

Shivsena AIMIM
औरंगाबाद
निवडणुकामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापायला लागलं आहे. औऱंगाबादेत शिवसेना आणि एमआयएममध्ये जुंपली आहे. दोघेही एकमेकांना दंगलखोर म्हणून हिणावत आहे. त्यामुळं येत्या काळात दोन्ही पक्ष भिडण्याची चिन्हं आहेत.

लोकसभा निवडणुकीत एमआयएमनं शिवेसनेचा पराभव करत विजय मिळवला. हा पराभव शिवसेनेच्या आणि खैरेंच्या सर्वाधिक जिव्हारी लागला आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत पराभवाची परतफेड करण्याची शिवसेनेनं तयारी सुरु केली आहे. त्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा दंगलीवरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाषणातही नेत्यांची भाषा घसरल्याचं दिसतं आहे.

तर खरे दंगलखोर कोण आहेत हे जनतेला माहित असल्याचा पलटवार एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

औरंगाबादेत सेना एमआयएम दोन्ही पक्ष जातीय राजकारण रंगवत आहेत. काही दिवसांपूर्वी औवेसी यांच्या सभेतूनही असाच राग आळवत सेनेविरोधात वंचितांनी एकत्र येण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे औरंगाबादेत निवडणुका जातीय समीकरणांवर लढल्या जाणार हे स्पष्ट आहे.