Breaking News

भिंगार वेस चौकात गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

भिंगार/प्रतिनिधी 
 येथील भिंगार वेस चौकात गटारावर उघडे जाळीचे चेंबर असून  काल दुपारी झालेल्या पावसामुळे गटार चोकअप असल्यामुळे व  गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी   जाळीच्या चेंबरद्वारे बाहेर येत होते. भिंगार बँकेकडे जाणारी पाइपलाइन बंद असल्यामुळे गटारीतील पाणी बाहेर येऊन बालाजी गारमेंटपर्यंत व पुढे सर्वत्र पाणी साचले होते.
त्याचवेळी भिंगारचा  शुक्रवारचा आठवडे बाजारचा दिवस असल्यामुळे भिंगार व परिसरातील नागरिक भिंगार गावात आठवडे बाजार खरेदी करण्यासाठी येतात परंतु रस्त्यावर नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी साचल्यामुळे नागरिकांना नाक  मुठीत धरून नाईलाजाने त्या घाण पाण्यातून रस्ता पार करावा लागत होता.
यापूर्वीही दुर्गंधीयुक्त पाणी शहरात पसरण्याचा प्रकार झाला होता. परंतु  यावेळी त्रास झालेले व परिसरातील जागरुक  नागरिकांकडून याची नोंद  घेतली गेली आहे.
 तरी याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन यापुढे असे दुर्गंधीयुक्त मैलामिश्रित पाणी रस्त्यावर साचणार नाही व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी याबाबत असे प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊन व त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी व्यापारी, दुकानदार, व आठवडे बाजारात येणार्‍या नागरिकांनी केली आहे.