Breaking News

....आणि संत गाडगेबांनी ढाळले अश्रू!

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्या दिवसापासून कुठल्या ना कुठल्या कारणाने ते बातमीचे मुख्य आकर्षण बनले आहेत.भारतासारख्या एका विशाल सार्वभौम राष्ट्राचे मुखिया म्हणून सुर्खिया तो बनेंगे ही बनेंगे...त्यात एव्हढ नवल ते काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.तथापी मोदींच पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय भुमिकेशी संबंधित मुद्यावर बातमीचे केंद्र बनणे वेगळी बाब आहे.याखेरीज मोदीं यांच्या विषयी प्रामुख्याने ज्या बातम्या मुद्दामहून व्हायरल केल्या जातात त्या बातम्यांमुळे मोदी बातमीच्या मथळ्याचा मथळा बनतात.पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या वागण्यात झालेला  किंबहुना त्यांनी स्वतःहून केलेला आमुलाग्र बदल सुर्खियांना जन्म देण्यास कारणीभूत ठरले आहे.देशातील बहुसंख्य नागरीकांच्या मते भारतासारख्या देशाचे पंतप्रधान असलेले मोदी कित्येकदा बालीश वागतात.हाच बालीशपणा त्यांना ट्रोल  करतो.याच बालीशपणातून ते राष्ट्राचे अनेक कायदेही मोडतात.आणि मग पंतप्रधान सामान्य नागरीकापेक्षा वेगळे आहेत का? त्यांना कायद्याचे बंधन नाही असे प्रश्न भारताची लोकशाही विचारते.
चिनचे अध्यक्ष जिनपींग दौऱ्यावर आले असतांना माॕर्निंग वाॕकला निघालेले पंतप्रधान बीचवर जातात आणि बिचवर जमा झालेला कचरा साफ करून अवघ्या देशाला स्वच्छतेचा संदेश देऊ पहातात.देशाच्या पंतप्रधानांनी बिचवर गोळा केलेला  कचरा ज्या पिशवीत भरला ती पिशवी प्लास्टीकची होती असा आक्षेप नेटीझन्सनी नोंदविला आहे.भारतीय संसदेने ज्या प्लास्टीकवर देशभरात बंदी आणली,बंदी झुगारणाऱ्याला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्याची तरतुद केली,त्याच प्लास्टीक पिशवीत पंतप्रधान कचरा भरतात आणि आपल्या कायद्याला वाकुल्या दाखवितात.असा आक्षेप नोंदवून नेटीझन्सने पंतप्रधानांना ट्रोल केले आहे.ही वस्तुस्थिती असेल तर नरेंद्र मोदी व्यक्ती म्हणून जेव्हढे दोषी त्याहून अधिक दोषी पंतप्रधान म्हणून ठरतात.
ज्या बीचवर मोदीनीं कचरा गोळा केला ती बीच तीन दिवसांपुर्वी इतर लोकांसाठी बंद केली होती ,सुरक्षारक्षक नेमले गेले .मेटलडिटेक्टरने दोन दिवस वाळुचा कणकण तपासला गेला मग स्पाँट कँमेरे लाइटस्   स्पेशल इफेक्टस् आदी बीचवर बसवले गेले नंतर निर्जतुक केलेला ठराविक कचरा तिथे ठेवला गेला तेव्हाच कुठे मोदींनी सत्तर रक्षकांच्या साक्षीने तो अनमोल कचरा जमा केला.असाही उपहास केला गेला.हे सारे पाहील्यानंतर स्वच्छतेचे खंदे पुरस्कर्ते संत   गाडगेबाबा ढसढसा रडले.अशा भावनाही व्यक्त केल्या गेल्या.