Breaking News

राहुरी येथे दिव्यांग मतदार सहायता कक्ष

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील राहुरी विधानसभा मतदार संघासाठी पंचायत समिती कार्यालयात दिव्यांग मतदारांनी लोकशाहीचा एक घटक म्हणून मतदानाचा हक्क बजावावा या उद्देशाने दिव्यांग मतदार सहायता कक्ष स्थापन करण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.
दिव्यांग समावेशित शिक्षणांतर्गत कार्यरत असलेल्या सुवर्णा ठाकूर यांनी मतदारांसाठी पुरविण्यात येणार्‍या व्हिल चेअर, रॅम्प, पीडब्ल्युडी अ‍ॅप, मतदान केंद्रापर्यंत स्वयंसेवक मदत, ब्रेल लिपी, मॅग्नेफाईग ग्लास या विविध सुविधांबाबत माहिती दिली.निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी दिव्यांग कक्षाबद्दल समाधान व्यक्त केले.  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ.आर.शेख यांनी दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत शंभर टक्केसहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी  गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी रोकडे, विषयतज्ञ संतोष गुलदगड, सतीश तांदळे, वंदना कांडेकर, नीलिमा गायकवाड, दिव्यांग समावेशित शिक्षण उपक्रमाचे कर्मचारी किशोर खेमनर, नवनाथ चेमटे, बाबासाहेब बोरसे, दादाभाऊ वायाळ, भीमराज चव्हाण व दिव्यांग मतदार उपस्थित होते.श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांनी लोकशाहीचा एक घटक म्हणून मतदानाचा हक्क बजावावा या उद्देशाने  दिव्यांग मतदार जागृती प्रभात फेरी काढण्यात आली होती.
यावेळी मतदान करण्याबाबत शपथ घेण्यात आली. तहसीलदार श्रीगोंदा यांनी यावेळी दिव्यांग मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले.