Breaking News

महादेव जानकरांना भाजपचा धक्का

दौंड
दौंड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केल्यामुळे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. कारण महायुतीमध्ये रासपच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार हे कमळ या चिन्हावर नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी भूमिका महादेव जानकर यांनी घेतली होती. आमदार राहुल कुल यांनी तीन फॉर्म भरले आहेत. त्या फॉर्ममध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून एक अर्ज दाखल केला. पण त्या सोबत राष्ट्रीय समाज पक्षाचा -इ फॉर्म जोडला नाही तर दोन फॉर्म भाजप या पक्षा कडून भरले आहेत.