Breaking News

पोलिसाच्या बायकोची दबंगगिरी, टोल मागितला म्हणून नाक्याची तोडफोड

कोटा
पोलिसांच्या दादागिरीच्या अनेक बातम्या कायम येत असतात. मात्र राजस्थानातल्या कोटा जिल्ह्यात पोलिसाच्या बायकोची दबंगगिरी समोर आलीय. पोलीस असूनही आपल्या नवर्‍याचा टोल का मागितला याचा राग तीला आला त्यामुळे रागाच्या भरात ती दांडकं घेऊन घाली उतरली आणि टोल नाक्याची तोडफड केली. हा सगळा प्रकार नाक्यावरच्या उउढतमध्ये कैद झाला असून पोलिसावर कारवाईची मागणी होतेय.  कोटा जवळच्या सीमल्या टोल प्लाझा इथली ही घटना आहे. या टोल नाक्यावरून मध्य प्रदेश पोलिसांचे कॉन्स्टेबल सुमन हे आपल्या कारने जात होते. कार टोल नाक्यावरून जात असताना नेहमी प्रमाणं कर्मचार्‍याने त्यांना टोल मागितला. मात्र त्यांनी आपण पोलीस असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतरही त्या कर्मचार्‍याने टोल मागताच त्या पोलिसाला आणि त्याच्या बायकोला राग आला.

नवर्‍याचा हा अपमान आहे असं वाटून ती गाडीतली काठी  घेऊन खाली उतरली आणि टोल नाक्याची तोडफोड सुरू केली. शेवटी पोलीस आल्याने प्रकरण शांत झालं. पोलिसांनी नाक्यावरचे कर्मचारी आणि पोलीस दाम्पत्याला स्टेशनला बोलावून चौकशी केली. दोघांनीही एकमेकांविरूद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.