Breaking News

मोदींच्या सभेमध्ये पैसे देऊन जमवली गर्दी

मुबंई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. गुरूवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये पंतप्रधानांची सभा झाली. यावेळी मोदींनी विरोधकांवर कलम 370 वरून निशाणा साधला. मात्र यासभेला भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी पैसे देऊन गर्दी गोळा केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला मोदींच्या सभेसाठी आम्हाला 600 रुपये रोजाने बोलवण्यात आले होते असा दावा केला आहे. मात्र या महिलांना 600 रुपये देण्याचे आश्‍वासन देणार्‍या भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍याने त्यांना नकार दिल्याने त्या या व्हिडीओमध्ये या पदाधिकार्‍याशी भांडताना दिसत आहे. ङ्गआम्ही शेजारच्या बाणगावमधील असून आम्हाला प्रत्येकी 600 रुपये देतो असं सांगून या सभेला येण्यास सांगितले होते. आम्ही सभेला आलो. आता ही व्यक्ती आम्हाला पैसे देत नाहीय,फ असा आरोप या महिलांनी व्हिडिओमध्ये केल्याचे दिसत आहे. या महिला आणि भाजपाच्या पदाधिकार्‍यांमध्ये मध्यस्थी करणार्‍या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे. हा मध्यस्थी करणारा व्यक्ती या दोन्ही महिलांना त्यांचे 1200 रुपये देण्याची मागणी भाजपाच्या पदाधिकार्‍याकडे करताना दिसत आहे. ङ्गपैसे देऊन सभेला गर्दी जमवता. हेच का तुमचे अच्छे दिनफ असा सवालही उपस्थित नागरिकांनी या पदाधिकार्‍याला विचारल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते. अनेक विरोधी पक्षांच्या समर्थकांनी फेसबुकच्या वेगवगेळ्या पेजेसवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.