Breaking News

शरद पवार पुन्हा मैदानात

मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसाचा निवडणूक प्रचार दौरा उद्यापासून सुरू होत आहे. शरद पवार यांनी पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोर्चा वळवला आहे. शरद पवार हे 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत झंझावाती दौरा करणार आहेत. सततच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील अनेक भागांत सभा घेतल्या होत्या.  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता, पारोळा सायंकाळी 5 वाजता, विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता.,  वाशिम जिल्ह्यातील मानोरा - कारंजा दुपारी 4 वाजता, हिंगणघाट इथं दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता, बुटीबोरी- हिंगणा 3 वाजता, काटोल सायंकाळी 5 वाजता.