Breaking News

वसंत टेकडीला राज्यस्तरीय दांडिया स्पर्धा

अहमदनगर/प्रतिनिधी
 “सावेडी उपनगरातील वसंत टेकडीजवळील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त येथील द्वारकामाई साई मंदिरात घटस्थापना व देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली असून दि.8 पर्यंत रोज विविध  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे’’ अशी माहिती साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील त्र्यबंके यांनी दिली.
दि 7 ला संध्या 7 ते 10 यावेळेत राज्यस्तरीय दांडिया स्पर्धा होणार असून  प्रथम क्रमांक 11 हजार व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 7 हजार व ट्रॉफी व तृतीय क्रमांक 3 हजार व ट्रॉफी या शिवाय अनेक बक्षिसे देण्यात येणार आहे तर या  स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत.
वसंत टेकडी येथे होणार्‍या दांडिया स्पर्धांना   प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नसून केवळ नवरात्रोत्सवानिमित्त दि.8 ऑक्टोबरपर्यंत राज्यस्तरीय दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांत विविध दांडिया ग्रुपने स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष योगेश पिपळे, सीमा त्र्यंबके, पुष्पा राऊत, गुड्डी कुडिया, कल्पना खोमणे, कमल गायकवाड, कमल कापडे, वंदना दगडे, पूजा यल्ला, रेश्मा पवणे, सविता मुनगेल, ऐश्‍वर्या पासकंटी आदींनी केले आहे.