Breaking News

महेश ट्युट्योरियलच्या शिक्षकाचा तरूणीवर अत्याचार

नवी मुंबई
खारघरमधील महेश ट्युटोरिअल या खासगी शिकवणीतील एका शिक्षकाने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर याच शिकवणीतील आणखी एका शिक्षकानेही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात आरोपी दिनेश जैन आणि अनुप शुक्ला यांच्यावर कलम 376, 342, 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर 12 मधील महेश ट्युटोरिअल क्लासमध्ये तक्रारदार तरुणी पार्ट टाईम काम करत होती. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी ही तरुणी कॉलेज करुन दुपारी या क्लासमध्ये पार्टटाईम नोकरी करायची. मागील आठवड्यात संध्याकाळी 7.30 वाजता ती क्लासमधून निघाली. पण छत्री विसरल्यामुळे परत क्लासमध्ये आली. त्यावेळी शिक्षक दिनेश जैनने दरवाजा बंद करुन दमदाटी करत तिच्यावर अत्याचार केला.
भीतीमुळे तरुणीने ही घटना कुटुंबीयांना लगेच सांगितली नाही. परंतु चार दिवसांनी दुसरे शिक्षक अनुप शुक्लानेही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अखेर तरुणीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला, त्यानंतर खारघर पोलिस ठाण्यात दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दोन्ही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.