Breaking News

दशमीगव्हाण ग्रामपंचायततर्फे गुणवंतांचा सत्कार

अहमदनगर/प्रतिनिधी

 नगर तालुक्यातील दशमीगव्हाण ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. विकास अंकुश काळे यांची तालुका कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्याचबरोबर अजित राजेंद्र काळे, सूर्यकांत उद्धव काळे व विजय देवराम काळे यांची गृहरक्षक दलात निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्वस्त धान्य दुकान चालक बाबा शेख यांचाही सन्मान करण्यात आला.

   यावेळी उपसरपंच बाबासाहेब काळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय काळे, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उद्धव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काळे, माजी सरपंच भाऊसाहेब काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सचिव माणिकराव काळे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर काळे, संचालक विलास काळे, भैरू काळे, मुख्याध्यापक चंद्रकांत काळे, बाळासाहेब काळे, सुनील काळे, पोपट काळे, किरण काळे, साईनाथ काळे, वैभव काळे, मुकेश काळे, झुंबर काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत उपसरपंच बाबासाहेब काळे यांनी केले.