Breaking News

फिरोदिया शिवाजीयन्स फूटबॉल स्पर्धांना प्रतिसाद

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील जिल्हा फूटबॉल संघटनेच्या मान्यतेने मॅक्सिमस स्पोर्ट अ‍ॅकॅडमी व शिवाजीयन्स स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय फूटबॉल चॅलेंजर कप स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेत 12,14,16 या वयोगटातील सहभागी विविध शाळांमध्ये 34 सामने झाले. येत्या आठ दिवसांत काँटर, सेमी व फायनल सामने नगर कॉलेज मैदानावर होणार आहेत. या स्पधार्ंत सहभागी शालेय मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी फूटबॉल प्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूना प्रोत्साहन देण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
14 वर्षांखालील गटात सेंट मायकल, ऑक्झिलियम स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात 1- 0 ने सेंट मायकलने विजय प्राप्त केला. सुधीर अग्रवाल याने एकमेव गोल केला.
श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल व प्रियदर्शनी स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात तनिष्क गायकवाड याने केलेल्या गोलवर प्रियदर्शनी संघाने विजय प्राप्त केला.