Breaking News

प्रादेशिक नेतृत्व खच्चिकरणाचे धोरण ! (पुर्वार्ध)

महायुती आघाडीच्या राजकारणात प्रादेशिक  नेतृत्व खुंटीत ठेवण्याचे धोरण जोमाने राबविले जात आहे. सत्ता स्थानावर पोहचण्यासाठी राजकीय प्रवाहातील अडथळे पार करण्यासाठी प्रादेशिक नेतृत्वाचा पुलासारखा  वापर केला जात असल्याचे दिसत आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भाऊ असलेल्या शिवसेनाही भाजपा नेतृत्वाच्या नजरेत प्रादेशिक पक्षच आहे.या भावनेतून शिवसेनेचे खच्चीकरण सुरू झालेच आहे.  दुसारीकडे सदाभाऊ खोत यांना भाजपाचा मांडलिक बनवून राजू शेट्टी आणि त्यांच्या पक्षाचे खच्चिकरण केले, आता राष्ट्रीय समाजवादी पक्ष आणि महादेव जानकर हे सुपात आहेत. जे महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे  पाळू शकत नाहीत त्यांच्याकडून जनतेप्रती निष्ठेची अपेक्षा कशी करायची?
खोटे अश्‍वासन देणार्या ढोंगी नेत्यांना  स्थानिक जनतेनीच धडा शिकवायला पाहीजे. पाच वर्ष तोंड न दाखवणारा फोन न उचलणारा, भेट घेण्यासाठी शिव मंदीराबाहेर असलेल्या नंदीप्रमाणे नृत्याच्या दालनाबाहेर  येरझार्‍या घालणार्‍या पिए नावाच्या भाटाला पुजण्याची आपल्याच मतदारांवर आणणार्‍या प्रवृत्तीच्या नेत्यांची पिलावळ आजच्या राजकारणात सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात हैदोस घालते आहे.आज कधी नव्हे  ती राजकारणात बेदीली माजली आहे.राजकारण जनतेलाच फसवते असे नाही तर एकमेकांना फसविण्याचा नवा धर्म राजकारणात स्थापन झाला आहे.कुठल्याही राजकीय पक्षाला स्वबळावर सत्तेत येण्याचे दिवस  आता कालबाह्य ठरले आहे. जनतेचा राजकारण्यांवर यत्किंचितही विश्‍वास राहीलेला नाही.जनतेच्या पदरात प्रत्येकवेळी विश्‍वासघाताचे दान राजकीय नेत्यांनी टाकले, त्याची ही प्रतिक्रीया आहे.एकहाती सत्ता मिळत  नाही म्हणून अन्य राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून निवडणूकीचे राजकारण करण्याची  पध्दत भारतीय राजकारणात सुरू झाली.जवळपास साठ वर्ष भारतावर निर्विवाद सत्ता भोगलेल्या काँग्रेसला जनतेला नाक ारण्यास सुरूवात केल्यानंतर प्रथमतः या देशात अशा आघाडीच्या राजकारणाचा उदय होऊ लागला.सोबतच प्रादेशिक पक्षांचाही जन्म होऊ लागला.हा काळ खर्‍या अर्थाने भारतीय राजकारणाच्या संक्रमणाचा काळ  ठरला. स्वतःला राष्ट्रीय म्हणविणारे राजकीय  पक्ष नव्याने वाढू लागलेल्या प्रादेशिक राजकीय पक्षांची उंबरे झिजवू लागली. ज्या प्रदेशात जो प्रादेशिक पक्ष प्रबळ असेल त्याला सोबत घेऊन निवडणूकीचा फड रंग विला जाऊ लागला. कुणी कुणासोबत जायचे यातून समविचारी, समान कार्यक्रम अशा काही नव्या संकल्पनांचाही उदय झाला. आणि भारतीय राजकारणाचे सरळ दोन गट पडले. धर्मनिरपेक्ष आणि हिंदूत्ववादी. यात  पुन्हा अनेकदा डाव्या आणि तत्सम विचाराच्या मंडळींनी या दोन्ही गटांशी समान अंतर ठेवून राजकारण केले आणि करीत आहेत. हे समान अंतर सोईच्या राजकारणाचा एक भाग आहे.म्हणूनच राजकारणातील  सोईप्रमाणे अस्तित्वात असलेल्या दोन्ही गटांच्या विरोधात तिसरी शक्ती उभी राहण्याचा प्रयत्न अधूनमधून  करीत असते.
राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या आघाडीच्या राजकारणाचे प्रमुख उदगाते. त्यात डावे आणि नंतरच्या काळात उत्तर भारतातील यादव, मायावती, लालू, नितिशकुमार, तिकडे ममता, पटनाईक, चौताला,  बादल दक्षिण भारतातील जयललिता,चंद्राबाबू, एन. टी. रामाराव, करुणानिधी, देवेगौडा आणि उत्तर दक्षिण मध्ये सुवर्णमध्य साधण्यासाठी नेहमीच धडपड करणार्‍या महाराष्ट्रातील शरद पवार, शेकापचे जयंत पाटील,  कम्युनिस्ट आणि अलिकडच्या काळात राजू शेट्टी, महादेव जानकर या पक्षाची सत्ता एकहाती ठेवणार्‍या नेत्यांनी खर्‍या अर्थाने आघाडीच्या राजकारणाला बळ दिले आणि उपभोगही घेतला. या  मंडळींच्या सोईच्या  राजकारणामुळे प्रादेशिक अस्मितेला प्रतिष्ठा प्राप्त झाली हे खरे असले तरी राष्ट्रीय राजकारणाचे मात्र नुकसान झाले. राष्ट्रीय पक्षांसोबत युती किंवा महाआघाडीत आपल्या राजकीय गरजेनुसार सहभागी झालेल्या या  समविचारी मंडळींनी इप्सित साध्य करून एकतर साथ सोडली किंवा दबावतंञाचा वापरा करून राष्ट्रीय पक्षांना अंकीत केले.
जनतेशी राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या प्रतारणेची ही परतफेड म्हटले तरी वावगे ठरणार नाही. निसर्गाचे चक्र आपल्या नियमांशी प्रतारणा करीत नाही. जे  केले त्याचे फळ पदरात पडतेच.आजच्या राजकारणाची दिशा आ णि दशा याच कर्तृत्वाची फळं आहेत. राष्ट्रीय पक्षांनीही प्रादेशिक नेतृत्व स्वतंञपणे विकसीत होऊ द्यायचे नाही असा ठाम निर्धार राष्ट्रीय पक्षांच्या नेतृत्वाने केलेला दिसतो. निडणूकीच्या राजकारणात प्रादेशिक नेत ृत्वाला वापरून घेण्याची नवी निती रूढ झाली आहे.अलिकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर भारतीय जनता पक्षाचा या नव्या नितीत कुणी हात धरू शकणार नाही.एक वेळ अशी होती, भारतीय जनता पक्ष  हा सत्तेत येईल अशी दूरदूर पर्यंत शक्यता दिसत नव्हती. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी शिवसेनेचा आधार घेतला. तेव्हा शिवसेना महाराष्ट्रात मोठा भाऊ होता. परंतु 1995 ची सत्ता वगळता  भाजप व शिवसेनेला सत्ता मिळवता आला नाही. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीत तत्कालीन युतीची विचारसरणी रूजणे शक्य नव्हते  हे ओळखून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातील घटक पक्षांना एकत्र के ले. शिवसेनेला सन्मान देत राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांची स्वाभीमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा रासप अशा छोट्या पक्षांची मोट बांधून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीचे पानिपत केले.  मुंडे यांच्या पश्‍चात भाजपा नेतृत्वाने प्रादेशिक नेतृत्वाचे आणि पर्यायाने प्रादेशिक पक्षाचे खच्चिकरण करण्याचे धोरण जोमाने राबविले.त्या धोरणाचा पहिला बळी ठरला राजू शेट्टी यांचा   स्वाभीमानी शेतकरी संघटना हा  राजकीय पक्ष. स्वयंभू नेता राजू शेट्टी हाताला लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर सत्तेसाठी कुठलीही किंमत मोजण्यास तयार असलेल्या सदाभाऊ खोत यांना जाळ्यात अडकवले.
पाच वर्षानंतर त्यांच्याच पक्षाचे रविंद्र तुपकर गळाला लागले.स्वाभीमानाला पिसल्यानंतर रासपाही जात्यात असल्याचे संकेत मिळता मिळता त्यांचाही घास घेतला जाणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.दोन मोहरे  गळाला लागले आहेतच. महादेव जानकर यांची ओळख म्हणजे महाराष्ट्रीय बड्या नेत्यांबरोबर कुस्ती खेळणे.महादेव जानकर यांच्या बरोबर धनगर समाज व बहुजन समाजाचे निर्णायक मतदार आहेत. 2014 लोक सभेला महादेव जाणकारांनी बारामती लोकसभेची खिंड लढवून पवार कुटुंबाला बारामतीत व्यस्त ठेवलं. याचा फायदा भाजप सेनेला झाला.  महादेव जानकर यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा  प्रचार तन मन धनाने केला. 2014 ला भाजप, सेनेला गरज होती तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची 1 व विधान सभेच्या 6 जागा महायुती मधून सोडण्यात आल्या. मात्र सत्ता मिळताच भाजपने आपले रंग  दाखविण्यास सुरुवात केली. महादेव जाणकारांना 2 वर्ष उशिरा मंत्रीपद दिले. तेही दुय्यम. 2019 च्या लोकसभेला 100 % विजयाची खात्री असताना महादेव जाणकार यांना बारामती लोकसभेची जागा सोडली  नाही. जागा सोडू मात्र कमळ चिन्हावर लढवा. महादेव जाणकार यांनी लढणार तर माझ्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावराच अन्यथा नाही. आसा स्वाभीमान जपणारा प्रादेशिक नेता भाजपा निती मोठा होऊ देणार नाही.  (पूर्वार्ध)