Breaking News

विजयादशमीला स्वयंसेवक संघाचे शहरात पथसंचलन

अहमदनगर/प्रतिनिधी
विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे शहराच्या विविध भागातून शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले. यावेळी संघाच्या घोषपथकाच्या निनादातील गणवेशातील स्वयंसेवक, संचलन पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी जमली होती. स्वयंसेवक संघाच्या संचलन मार्गावर फुलांची उधळण करीत स्वागत केले जात होते.
माळीवाडा भागातील भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या मैदानातून संचलनास प्रारंभ झाला. त्यानंतर माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, महाजनगल्ली, नवीपेठ, नेता सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, पटवर्धन चौक, कोर्टगल्ली, स्वामी विवेकानंद चौक, जुना बाजार, जुनी महानगरपालिकामार्गे पुन्हा भाऊसाहेब फिरोदिया मैदानावर समारोप झाला.
संघाच्या शहरातील विविध भागांतील शाखांच्या वतीने विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि.8)  एकत्रित संचलन करण्यात आले. या संचलनात प्रांत संघचालक नाना जाधव, जिल्हा संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, शहर संघचालक शांतीभाई चंदे, तालुका संघचालक भरत निंबाळकर यांच्यासह शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते.