Breaking News

कॉ.आबासाहेब काकडे हे समरस होवून काम करत : अ‍ॅड. भोर

शेवगाव/प्रतिनिधी
कॉ.आबासाहेब काकडे समाजासाठी समरस होवून काम करत. गरीब, दीनदलित जनसामान्यांसाठीच आबासाहेबांनी वकिली केली. खेड्यापाड्यातील गरीब शिकले तर त्यांचे आयुष्य बनेल हीच आबासाहेब काकडे यांच्या विचारांची स्पष्टता होती. हिच स्पष्टता सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कामी आली असे, प्रतिपादन अ‍ॅड.सुभाषराव भोर यांनी केले.
कॉ.आबासाहेब काकडे यांच्या 41 व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आबासाहेब काकडे विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मा.सभापती डॉ.टी.के.पुरनाळे, रावसाहेब बर्वे, देवराव दारकुंडे, मच्छिंद्र महाराज भोसले, विश्‍वनाथ पुरनाळे, मंदाकिनी पुरनाळे, सुनंदा भोर, अ‍ॅड.शंकरराव भालसिंग, प्रा.विजयराव भोर, विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत आहेर, उपप्राचार्य सुनिलराव आढाव, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षिका मंदाकिनी भालसिंग, पुष्पलता गरुड, प्रा.अप्पासाहेब सोनवणे, प्रा.मधुकर शेटे तसेच विद्यालयाचे माजी प्राचार्य, शिक्षक व परीसरातील आबासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते सर्व विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत आहेर म्हणाले की, आबासाहेबांनी स्वतः साठी काही न करता समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट केले. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी जीवनभर आंदोलने व संघर्ष केला. कुटुंबातील चांगले संस्कार हे आबासाहेबांच्या कामी आले. आबासाहेबांना आदर्शवत मानून त्यांचा एकतरी गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा. शिक्षक प्रतिनिधी म्हणून पर्यवेक्षिका मंदाकिनी भालसिंग यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ज्ञानेश्‍वरी झिरपे, गायत्री कुलट, भक्ती टेकाळे, भारती घनवट चि.अमरसिंग ढाकरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चेमटे व गोविंद वाणी यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे यांनी मानले.