Breaking News

शिवम स्कूलमध्ये अवतरल्या नवदुर्गा

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील केडगावमधील लोंढे मळा भागातील शिवम ग्लोबल स्कूल येथे दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त कुमारी पूजन व गरबा नृत्याचे कार्यक्रम झाले. देवीच्या नऊ रुपात मुली वेशभूषा करुन आल्या होत्या.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात देवी रुपातील मुलींची पूजा संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा लोंढे यांनी केली. उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लावण्यात आले. नीलिमा डाके व वर्षा मंदीलकर यांनी बसविलेले दांडिया नृत्य विद्यार्थिनीनी सादर केले. यावेळी महिला पालक मोठ्या उत्साहाने दांडियामध्ये सहभागी झाल्या होत्या.
सूत्रसंचालन मयुरी कुलकर्णी यांनी केले. अष्टभूजा देवीसंदर्भात माहिती सांगून पूजा दळवीने आभार मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक नंदकुमार शेजूळ, संस्थेचे अध्यक्ष संतोष लोंढे, सौरभ लोंढे, श्रेया लोंढे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य नंदकुमार शेजूळ, मयुरी कुलकर्णी, वर्षा मंदीलकर, अश्‍विनी हारदे, पूजा दळवी, नीलिमा डाके, राजश्री यादवाडकर, संगीता देशमुख, ऐश्‍वर्या वाघ, उषा कोतकर, अमर जगताप यांनी परीश्रम घेतले.