Breaking News

प्रो कबड्डी लीग : यूपी योद्धा बाद फेरीत

नोएडा/वृत्तसंस्था
दुखापतीतून सावरलेल्या मोनू गोयतच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर यूपी योद्धाने दबंग दिल्लीचा 50-33 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीतील सहावे स्थान निश्‍चित केले. सामन्याच्या पहिल्या सत्रातच यूपी योद्धाने 22-12 अशी एकतर्फी आघाडी मिळवली. मग दुसर्‍या सत्रातही यूपीने ती टिकवली. मोनूने चढायांचे 11 गुण मिळवले, तर श्रीकांत जाधवने नऊ गुण मिळवत त्याला छान साथ दिली.
दुसर्‍या सामन्यात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजायंट्सला 39-33 असे नामोहरम केले. पाटण्याकडून प्रदीप नरवालने चढायांचे 17 गुण मिळवले. गुजरातच्या जी. बी. मोरेने 15 गुण मिळवून छाप पाडली.