Breaking News

परतीच्या पावसाने शेती मालाचे नुकसान

खरवंडी कासार/प्रतिनिधी
परतीच्या पावसामुळे शेतीतील, कपाशी, बाजरी, तीळ या खरिप, मालाचे मोट्या प्रमानात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणामध्ये शेतकर्‍यावर आसमानी संकट आले आहे. एकीकडे दिवाळीचा सण करावा की, शेतीतील माल वाचवायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच विधानसभा निवडणूकी झाली असून शेतकर्‍याला प्रशासनाची कसल्याही प्रकारची मदत मिळत नाही.त्यामुळे शेतकरी हताश व निराश झाला आहे. शेतकर्‍याने कर्ज काढून  शेतीची पेरणी केली, पण सततच्या पावसाने पिक वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून काही शेतकर्‍याने  दागिने घाण ठेवून पेरणी व खते घेतले. शेतामधील पिके पाऊसाच्या पाण्यामध्ये सडून गेले आहेत. पाथर्डीच्या पूर्व भागात कपाशीचे क्षेत्र जास्त असून कपाशीचे बोंडे सडल्यामुळे हातातोंडाशी आलेले कपाशीचे पीक पदरात पडले नाही. त्यामुळे कधी सरकार आमच्याकडे लक्ष देईल व मदत मिळेल असे शेतकर्‍यांना वाटत आहे.