Breaking News

पवार साहेब नटरंग तर राज ठाकरे म्हणजे एंटरटेनमेंट...:मिसेस फडणवीस

‘मामूची मामी, करमणुकीची नाही कमी’: मनसे

Amruta Fadanvis
मुंबई
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वातवरण आहे. सध्या राजकीय विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. हातवारे आणि नटरंगी टीकेनंतर आता एन्टरटेनमेंटची टीका राज्यात धुमाकूळ घालत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसे समर्थकांनी हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे म्हणजे एंटरटेनमेंट... एंटरटेनमेंट... एंटरटेनमेंट... असल्याचं अमृता यांनी म्हटलं होतं. आता यावरूनच मनसे समर्थकांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस यांचा बोटीवर सेल्फी क्लिक करणारा व्हिडिओ मनसे समर्थकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी ‘मामूची मामी, करमणुकीची नाही कमी’असं म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी अरबी समुद्रात क्रूझच्या टोकावर बसून काढलेल्या सेल्फीवरूनही वाद निर्माण झाला होता. त्याचाच व्हिडिओ आता वापरून ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणजे एन्टरटेनमेंट एन्टरटेनमेंट एन्टरटेनमेंट’ असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यातमामूची_मामी_करमनूकीची_नाही_कमी असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

गेल्या वर्षी 20 ऑक्टोबरला मुंबई-गोवा क्रूझ पर्यटन सुरू करण्यात आलं. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रूझच्या टोकावर जाऊन सेल्फी घेतला होता. तेव्हा त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. याच व्हिडिओचा वापर करून राज ठाकरे समर्थकांनी टीका केली आहे.

कुस्ती लढायला समोर पैलवान नाही या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हातवारे केले होते. शरद पवार म्हणाले होते की कुस्ती तर पैलवानांसोबत होते अशांसोबत नाही. त्यानंतर पुन्हा बार्शीतील सभेत पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. मुख्यमंत्री म्हणाले होते की, समोर कोणी चांगलं लढायला नसल्यानं निवडणूक लढवण्यात मजा येत नाही. पवार साहेब नटरंग सारखे हातवारे करायला लागले आहेत.