Breaking News

दिव्यांग मुलांच्या शाळेत मतदान जागृती

अहमदनगर/प्रतिनिधी
दिव्यांग विकास शिक्षण मंडळ संचलित दिव्यांग मुलांची शाळा व ज्योत्स्ना उद्योग केंद्रात आयोजित पालक सभेत मतदान जागृती अभियान कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. यावेळी समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, मुख्याध्यापिका स्नेहा महाजन उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित पालक, दिव्यांग विद्यार्थी यांना सुलभ मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नितीन उबाळे म्हणाले, “सर्व दिव्यांग व्यक्तींनी मतदानाचा हक्क आवर्जून बजावला पाहिजे. प्रौढ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने पालकांनी एकत्र येऊन बचत गट सुरु करावे’’, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी ईव्हीएम मशीन, व्हिव्हिपॅट मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तहसील कार्यालयातील अधिकारी व्ही.ए.क्षीरसागर, बी.के.जाधव यांनी मतदान प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. यावेळी सर्वांना मतदान यंत्र, व्हिव्हिपॅट हाताळण्याचा अनुभवही देण्यात आला. सूत्रसंचालन माधवी कुटे यांनी केले. भाऊसाहेब कदम यांनी आभार मानले.