Breaking News

विरोधकांना आत्ताच 'कुकडी'चा पुळका का?:पंकजा मुंडे

जामखेड/प्रतिनिधी
ते (धनंजय मुंडे) जिथे जिथे प्रचाराला जातात तिथल्या उमेदवाराचा पराभव होतो. त्यामुळे रामभाऊ काळजी करण्याचे कारण नाही. तुमचा विजय निश्चित आहे. असे सांगत विरोधकांनी आत्ताच कसा कुकडीच्या पाण्याचा पुळका आला? असा सवाल करत जेव्हा जलसंपदा खातं त्यांच्याकडं होतं तेव्हा का नाही पाणी आणलं? असा टोला राष्ट्रवादीला पंकजा मुंडे यांनी लगावला. पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

 पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या की, राष्ट्रवादीने पंधरा वर्षांच्या काळात केलेली घाण दूर करण्यासाठी पाच वर्षे पुरेसे नाहीत. संपूर्ण घाण काढण्यासाठी आणखी एक टर्म द्या असे आवाहन करत राम शिंदे यांना भक्कम साथ देण्याचे आवाहन मुंडे यांनी केले.यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, रमेश खाडे यांच्यासह महायुतीच्या मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.