Breaking News

एमआयडीसी नाकारून निळवंडे कालव्याला विरोध करणाऱ्यांना निवडून देणार का?

संगमनेर/प्रतिनिधी
राजकीय अपघाताने निर्माण झालेल्या सहानुभुतीच्या लाटेवर आमदार झालेल्या परप्रकाशीत नेतृत्वाने वेठीस धरण्याशिवाय संगमनेकरांना कुठला विकास  मिळाला?  ज्यांना स्वतःचे घर बांधता आले नाही ते काँग्रेसचे घर काय टिकविणार? संगमनेर तालुका उध्वस्त करणाऱ्या सगेसोयऱ्यांच्या राजकारणाला प्रोत्साहन देऊन तालुकाभर कुटूंबशाही  प्रस्थापीत करणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार का? असे प्रश्न उपस्थित करून वंचित बहुजन आघाडीने संगमनेर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा  साधला आहे. प्रसिध्दीसाठी दिलेल्या पञकात संगमनेर विधानसभा मतदार संघात उभे असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापुसाहेब ताजणे यांना संगमनेरकरांनी का निवडून  द्यायचे याची कारण मिमांसा करतांना 1985 पासून विधानसभेत संगमनेरचे प्रतिनिधीत्व करणारे कांग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कारभाराचे बाभाडे काढले  आहेत.या पञकात म्हटले आहे की,सहकारापासून शासनापर्यंत आपल्याच घरातील माणसं सत्तेवर असली पाहीजेत या अट्टाहासाने थोरातांनी तालुक्यातून नवे नेतृत्व उभे राहू दिले  नाही.ज्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांची अवस्था दयनीय केली.अशी अनेक उदाहरणे तालुक्यात आढळतात.
एका बाजूला तरूण नेतृत्वाची उमेद खच्ची करणाऱ्या या स्वयंभू नेतृत्वाने दुसऱ्या बाजूला तरूणाईला बेरोजगार बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला.अनेक वर्ष मंञीपद भोगूनही संगमनेर  तालुक्याला विकासाच्या योजना देता आल्या नाहीत. उलट सरकारने मंजूर केलेल्या योजना तालुक्याच्या बाहेर पाठवून संगमनेरकरांशी प्रतारणा केली. संगमनेरसाठी मंजूर असलेली  महाराष्ट्र शासनाची औद्योगिक वसाहत नाकारून ती सिन्नरला पाठवली.आज संगमनेरच्या पोरांना काम मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही वसाहत संगमनेरला झाली  असती तर हजारो तरूणांना काम मिळाले असते आणि थोरात आणि कंपनीसाठी राबणारे हात उरले नसते हा स्वार्थ या मागे असावा अशी शंका या पञकात व्यक्त करण्यात आली  आहे. आज कळीचा मुद्दा बनलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या प्रश्नांच्या मुळाशी देखील थोरात निती दडली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या स्वार्थामुळेच हे कनाल प्रलंबीत आहेत.  कारखान्यांना पाणी टंचाई भासू नये हा त्यामागे त्यांचा दुर्हेतू असल्याचा आरोप करून संगमनेरकरांनी सावध होण्याचा इशारा या पञकात दिला आहे