Breaking News

खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारास कोठडी बॅनर

गंगागिरी महाराज देवस्थानकडे केली २ कोटींची मागणी

कोपरगाव /ता. प्रतिनिधी
गंगागिरी महाराज देवस्थानची बदनामी करण्याची भीती दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या युट्युबच्या तोतया पत्रकारास पोलिसांनी अटक केली आहे. विनायक कांगगे ( रा . मोनालीसा सोसायटी , डोबवली एमआयडीसी कल्याण ) असे त्याचे नाव असून यास न्यायालयाने १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील आणि वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील सराला बेट येथील महंत रामगिरी यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या कांगणेला महसरुळ पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार  वैजापूर तालुक्यातील बाबासाहेब थेटे ( रा . सायखेड गंगा ता .वैजापूर , औरंगाबाद) यांनी तक्रार दिली आहे.

 काही महिन्यांपूर्वी येवला तालुक्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दोनशे ते अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहात लाखो भाविक येतात. या कार्यक्रमाला संशयित आरोपी तिथे आला होता. त्याचे यू टयूबचे ' आधार ' नावाचे चैनल असून,  सप्ताहाचा कार्यक्रम कांगणे कव्हर करीत असल्याचे भासवत होता. यावेळी त्याने काही चुकीची माहिती संकलित केली.  ही माहिती महंत रामगिरी यांच्या भक्तापर्यंत पोहचली, अशी चुकीची माहिती प्रसिद्ध करू नये, अशी विनंती भक्तमंडळीने केली. मात्र कांगणे याने दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी यांच्यासह इतर काही मध्यस्थ व्यक्तीने कांगणेला समजावून सांगितले. मात्र कोणाचेही ऐकलं नाही. अखेर तडजोड म्हणून याप्रकरणी सव्वा कोटी रुपये देण्याचे ठरविण्यात आले. कांगणेने वैजापूर अथवा सराला बेटावर येण्यास नकार दिला. थेटे यांनीही डोबवलीला जाण्यास नकार दिला. शेवटी नाशिक ठिकाण निश्चित करण्यात आले. दरम्यान ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर येऊन थेटे यांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठून सर्व माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सांगळे यांना सांगितली. त्यांनी सापळा लावून त्यास अटक केली.