Breaking News

महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात कर्मचार्‍यांचे रक्तदान

नेवासे/प्रतिनिधी
नेवासे येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात वीज वितरण कंपनीच्या एकूण 24 कर्मचार्‍यांनी  रक्तदान केले. वीज वितरण कंपनीचे जिल्हा ग्रामीणचे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विज वितरण कंपनीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात 24 जणांनी रक्तदान केले. सदरचे रक्त अहमदनगर येथील जनकल्याण रक्तपेढीला देण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महा वितरण कार्यालयात झालेल्या सदर रक्तदान शिबीर प्रसंगी महावितरणचे नेवासे येथील उपकार्यकारी अभियंता शरद चेचर, सहाय्यक अभियंता मनोहर पाटील, दुधे, काळे, वाघ, आकाश शेजुळे, कायास्थे, राकेश भंगाळे, विजय पाटील, कनिष्ठ लिपिक शरद आरगडे, बिलिंग विभागाचे भूषण पवार, नितीन जोशी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी डॉ.विलास मढीकर, डॉ. वसंत झेंडे यांचे अनमोल सहकार्य लाभले. सदर रक्तदान शिबीर राबवून महावितरण कंपनीने रक्तदान शिबीर राबवून सामाजिक बांधिलकी जपली व  एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. असे गौरवोद्गार उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी गौरवोदगार काढले.