Breaking News

कोपरगावच्या विकासासाठी परिवर्तन घडवा:चैताली काळे


कोपरगाव/प्रतिनिधी

 सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून जनतेत बसणारे आशुतोष काळे यांच्या सारखे लढवय्ये लोकप्रतिनिधी जेव्हा विधानसभेत जातील तेंव्हाच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. त्यासाठी येणाऱ्या कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ तारखेला आशुतोष काळे यांना विजयी करून परिवर्तन घडवा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले.

  कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ (दि.१० रोजी) करंजी, दहेगाव बोलका या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात आली. त्यावेळी चैताली काळे यांनी मतदारांशी हितगुज केले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, २०१४ ला सर्वाना विकासाची जी स्वप्न दाखवली त्यातील एकही स्वप्न पूर्ण झालेले नसून उलट अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे पाणी गेले, व्यावसायिकांचे व्यवसाय थंडावले. दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आशुतोष काळे यांनी ग्रामीण भागातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांपर्यंत विकास पोहोचविला आहे. यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. सर्वसामान्यांसाठी केलेला संघर्ष डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याची तळमळ असणारे आशुतोष काळे विधानसभेत तुमचे सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास चैताली काळे यांनी उपस्थितांना दिला.

  यावेळी कारभारी आगवण, चांगदेव आगवण, सांडूभाई पठाण, कारभारी भिंगारे, अनिल महाले, भास्कर शहाणे, कारभारी जाधव, केशव चरमळ, केशव शिंदे, शिवाजी कापसे,मुक्तार शेख, संतोष आगवन,योगेश आगवण, भास्कर वल्टे, गुलाब देशमुख, अनिल वल्टे, जगन बागल, अरुण वल्टे, दादासाहेब काकडे, पुंडलिक वाकचौरे, पोपट काकडे, रावसाहेब अभंग, दिगंबर देशमुख, गणपत सावंत, बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.