Breaking News

संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा

16 हजारांचा मुद्देमाल जप्त ;सात जण ताब्यात ; गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी
संगमनेर शहरातील रहमत नगर परिसरात जुगार सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील 16 हजार 220 हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
शनिवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वसीम मोईन शेख (वय 30), अकिल हसन सय्यद (वय 32), शोएब खान मोहम्मद शेख (वय 32), अजहर अन्सार पठाण (वय 32) (सर्व रा.नाईकवाड पुरा,संगमनेर), अरबाज नूर मोहम्मद शेख (वय20.रा.एकता नगर, संगमनेर), कलीम करीम शेख (वय 26), काशीम सय्यद इक्चाल (वय 29) (दोघेही रा.रहमत नगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत. पोलिस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक आरवडे तपास करीत आहेत.