Breaking News

हरभजनने पाकिस्तानी अभिनेत्रीला शिकवले इंग्रजीचे धडे

Harbhajan Veena
नवी दिल्ली/वृत्तसंस्था
भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणावरून टीका केली होती. त्याने म्हटलं होतं की, इमरान खान यांच्या भाषणात फक्त द्वेष आणि धमकी होती. त्यातून युद्धाची भाषा आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढणं यातून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढेल असं म्हटलं होतं. हरभजनच्या या ट्वीटवर आक्षेप घेत पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने त्याला इंग्रजी शिकण्याचा सल्ला दिला होता.
वीणा मलिकच्या त्या ट्विटवर हरभजन सिंगने उत्तर दिलं आहे. त्यानं वीणालाच इंग्रजीचे धडे दिले आहेत. हरभजनने वीणा मलिकच्या ट्विटमधील इंग्रजीच्या चुका दाखवून पुढच्यावेळी इंग्रजी शिकून येण्यास सांगितलं आहे. हरभजनने ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, संयुक्त राष्ट्रसंघातील महासबेत भाषणात भारताला अणुयुद्धाच्या धमक्या देण्यात आल्या. एक प्रमुख वक्ता म्हणून इमरान खान यांच्याकडून रक्तपात, शेवटच्या क्षणापर्यंत लढणे यासारखे शब्द वापरल्यानं दोन्ही देशात फक्त तणाव वाढेल. एक खेळाडू असल्यानं त्यांच्याकडूनं शांततेसाठी पुढाकार घेणं अपेक्षित होतं.
त्यावर वीणा मलिकने म्हटलं होतं की, पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांच्या भाषणात शांततेवरच चर्चा केली होती. त्यांनी वास्तव आणि संचारबंदी हटवल्यानंतर समोर आलेल्या गोष्टीवर मत मांडले. ते म्हणाले की, रक्तपात होणं क्लेशदायक आहे. तसेच ही धमकी नसून भीती आहे. तुम्हाला इंग्रजी येत नाही का? असा प्रश्‍न वीणा मलिकने विचारला होता. वीणाच्या ट्विटनंतर हरभजनने तिला इंग्रजीचे धडे शिकवले. तिच्या ट्विटमधील इंग्रजीच्या स्पेलिंगमधील चुका त्याने दाखवल्या. हरभजन म्हणाला की,  surly म्हणजे काय? ते Surely आहे का? मस्त रहा.. पुढच्या वेळी इंग्रजीत काही लिहण्यापूर्वी शिकून ये असं हरभजनने म्हटले.