Breaking News

सुप्रीम कोर्टात ’हाय होल्टेज ड्रामा’, वकिलांनी फाडला नकाशा

राम जन्मभूमी वादाचा युक्तीवाद पूर्ण; 23 दिवसांमध्ये येणार निकाल


नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली याचिकांवर सुनावणी झाली. बुधवारी सकाळपासून दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद सुरू होता. पाच वाजेपर्यंत न्यायालयात सुनावणी चालणार होती. मात्र, चार वाजताच सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी 23 दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.अयोध्य प्रकरणातल्या सुनावणीदरम्यान आज हाय होल्टेज ड्रामा घडला. प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच मुस्लिम संघटनांच्या पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी कोर्टात नकाशा फाडला हिंदू महासभेच्या वतीने परिसराच्या जमिनीचा नकाशा कोर्टात सादर करण्यात आला होता. वकील राजीव धवन यांच्या या वर्तनाबद्दल सरन्यायाधीशांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या प्रकरणावरच्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस होता. सर्वच पक्षकारांनी 5 वाजेपर्यंत आपला शेवटचा युक्तिवाद पूर्ण करावा अशी सूचना सरन्यायाधीश रंजन गोगोई  यांनी सर्व वकीलांना केली होती. सुप्रीम कोर्टाने जी मुदत घालून दिली होती त्या आधी एक दिवस सर्व सुनावणी करून कोर्ट आपला निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत देणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली याचिकांवर सुनावणी झाली. बुधवारी सकाळपासून दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद सुरू होता. पाच वाजेपर्यंत न्यायालयात सुनावणी चालणार होती. मात्र, चार वाजताच सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी 23 दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

सरन्यायाधीशांच्या परवानगीनंच पानं फाडली : धवन
हिंदू महासभेने न्यायालयात राम जन्मभूमीचा नकाशा दाखवला होता. पंरतु मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी तो नकाशा फाडल्याची माहिती समोर आली होती. ’मला ती पानं दूर फेकायची होती. परंतु मुख्य न्यायाधीशांनी ती पान फाडण्यास सांगितलं. त्यानंतर ती पानं फाडली’ असल्याचं स्पष्टीकरण धवन यांनी दिलं.

दिवाळीमध्ये अयोध्येत पूजा अर्चा करण्याची परवानगी द्या - हिंदू संत
दिवाळीमध्ये रामजन्मभूमीच्या जागी प्रार्थना, पूजा अर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे हिंदू संतांनी केली आहे. विश्‍व हिंदू परिषदेचे नेतेही विभागीय आयुक्त मनोज मिश्रा यांना भेटले असून त्यांनी हिंदू संतांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. हिंदूंना अशी परवानगी दिली तर आम्ही पण तिथं नमाज पढू असा इशारा बाबरी कृती समितीनं दिला आहे.

उत्तर प्रदेशात सरकारी अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द
राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीकडे पाहता उत्तर प्रदेश सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व सरकारी अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्ती पूर्वी याप्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

सुन्नी वक्फ बोर्डाचा या जागेशी काही संबंधच नाही - शिया वक्फ बोर्ड
जागेच्या मालकिविषयी वाद असलाच तर शिया व सुन्नी वक्फ बोर्डामध्ये असायला हवा, पण या प्रकरणी सुन्नी वक्फ बोर्डाचा ताही संबंधच नसल्याचा दावा शिया वक्फ बोर्डाच्या वकिलांनी केला आहे. हिंदूंची बाजू मांडणार्‍या वकिलांच्या युक्तीवादानंतर शियांच्या वतीनं युक्तीवाद करण्यात आला.

अन्य जागा घेण्यास सुन्नी वक्फ बोर्डाची तयारी?
सुन्नी वक्फ बोर्ड अन्य जागा घेण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. तसच मध्यस्थींचा अहवालही न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. वादग्रस्त जागा सोडून अन्य ठिकाणी जागा घेण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी
अयोध्या प्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. यामध्ये न्यायमूर्ती एस.ए.बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नाझीर यांचा समावेश आहे