Breaking News

टिकटॉक स्टार सोनाली फोगटनं मागितली माफी

Sonali Phogat
चंदिगड
भारतीय जनता पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणुकीत टिकटॉक स्टार अशी ओळख असलेल्या सोनाली फोगटने ग्रामस्थांची माफी मागितली आहे. मंगळवारी बालसमंद गावात प्रचारावेळी भारत माता की जय न म्हणणाऱे पाकिस्तानचे आहेत का? असं टिकटॉक स्टारनं विचारलं होतं. भारत माता की जय न म्हणायची लाज वाटते का असं राग आल्यानं सोनाली फोगटने सभेत विचारलं होतं. मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. मात्र भारत माता की जय म्हणायला हवं होतं. मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा असं सोनाली फोगटनं म्हटलं आहे. भारत माता की जय म्हणायला काय अडचण आहे असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे.

सोनाली फोगट का भडकली
भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ढळज्ञढेज्ञ स्टार तिच्या घोषणांना लोकांनी प्रतिसाद न दिल्याने चिडली होती. घोषणा न देणार्‍यांना तिने तुम्ही पाकिस्तानचे आहात काय असा प्रश्‍न विचारला होता.

निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून घोषणा देताना लोकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्यानं सोनाली फोगट नाराज झाली होती. त्यानंतर घोषणा न देणार्‍याना थेट पाकिस्तानी असल्याचं म्हटलं होतं. लोकांना आवाहन करताना सोनालीने म्हटलं होतं की, तुम्ही माझ्यासोबत भारत माता की जय म्हणाल.

लोकांनी भारत माता की जय म्हटलं पण त्यात लोकांची संख्या कमीच होती. त्यावरून भडकलेल्या सोनालीने लोकांना प्रश्‍न विचारला की, तुम्ही पाकिस्तानमधून आला आहात का? तुम्ही भारतीय असाल तर भारत माता की जय म्हणाल. त्यानंतर पुन्हा तीने दोन वेळा भारत माता की जय म्हटलं. तरीही लोकांनी प्रतिसाद न दिल्यानं ती म्हणाली की, मला लाज वाटते की तुमच्यासारखे लोक भारतात राहतात.

भाजपकडून सोनाली निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिच्याविरुद्ध काँग्रेसचे कुलदीप बिश्‍नोई आणि इंडियन नॅशनल लोकदलाकडून राजेश गोदरा हे निवडणूक लढणार आहेत.सोनालीचे पती संजय फोगट भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनालीने भाजपमध्ये प्रवेश केला. हरियाणातील भाजपची महिला उपाध्यक्ष म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने शेवटच्या यादीत 12 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये सोनालीचे नाव आहे. तिच्याविरुद्ध काँग्रेसकडून लढणार्‍या कुलदीप यांनी 2014 च्या निवडणुकीत स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणूक लढली होती.