Breaking News

बडव्यांमुळे दैवताची साथ सोडावी लागली: नितीन नांदगावकर

मुंबई
काही दिवसांपूर्वी मनसेचे डॅशिंग नेते म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे नितीन नांदगावकर. पण राज ठाकरे यांच्यासोबत निवडणुकीच्या आखाड्यात सोबत राहण्याआधीच त्यांनी साथ सोडली. राज ठाकरेच माझे दैवत आहेत आणि राहतील, असं सांगत मनसे का सोडली, याचा खुलासाचा आता नांदगावकर यांनी केली.
नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडल्यानंतर सोशल मीडियावर एकच विषय ट्रोल होत होता तो म्हणजे नितीन नांदगावकर यांनी मनसे पक्ष का सोडला. काय कारण होते? निवडणुकीचे तिकीट न दिल्याने नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडला का? या अनेक प्रश्‍नांची उत्तरे नितीन नांदगावकर यांनी  दिली.
नांदगावकर म्हणाले, ’राज ठाकरे हे माझ्या दैवत आहेत आणि राहतील. पण त्यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळं मनसे सोडावी लागली.’
विशेष म्हणजे, मनसे निवडणूक लढणार की नाही अशी चर्चा सुरू होती. अखेर कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांच्या आग्रहानंतर राज यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अनेक पदाधिकारी आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यातच एक नाव होतं नितीन नांदगावकर यांचं. परंतु, पहिली यादी जाहीर झाली, दुसरीही यादी जाहीर झाली पण नांदगावकर यांचं नाव काही आलं नाही. त्यामुळे नाराज झालेले नांदगावकर सेनेत दाखल झाले.

डॅशिंग नेते
गेले काही वर्षे नितीन नांदगावकरांनी बेशिस्त ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बदडून काढत चांगलंच सरळ केलं होतं. त्यामुळे ते प्रवाशांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यांचा दरबारही चांगलाच लोकप्रिय आहे. अडल्या नडल्यांसाठी ते नेहमी धावून येतात. एवढंच नाहीतर काही परदेशी नागरिक सुद्धा त्यांच्या दरबारात मदत मागण्यासाठी आले होते. साहजिकच नांदगावकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण, ज्या मनसेचा झेंडा हाती घेऊन नांदगावकर खिंड लढवली. त्यांना विधानसभेचं तिकीटच मिळालं नाही. त्यामुळे नाराज झालेले नांदगावकरांना सेनेची वाट धरावी लागली. ’माझ्या दैवताला बडव्यांनी घेरलं’ त्यांच्या या विधानामुळे राज ठाकरे यांच्याभोवत नेमके बडवे कोण आहे, हा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.