Breaking News

देवीभोयरेत राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

पारनेर/प्रतिनिधी
नवरात्र उत्सवानिमित्त 9 दिवस चालू असलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा देवीभोयरे येथे मच्छींन्द्र लंके यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामक्षा ट्रान्सपोर्टचे मालक सुभाष मुळे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून जेष्ठ दिग्दर्शक रामदास काळे व मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष विश्‍वनाथ बेलोटे हे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये ऋणानुबंध कला आविष्कार मुंबई यांच्या मला 1 चानस हवा या नाट्य प्रयोगास प्रथम क्रमांकाचे 51 हजार रुपयाचे विजेता चषक तसेच प्रमाण पत्र मिळाले. तसेच द्वितीय क्रमांक मल्हार प्रोडक्शन अहमदनगर यांच्या आता कस करू, या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे 31 हजार रुपये व चषक व प्रमानपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकासाठी संक्रमण पुणे निर्मित आपुलाची वाद आपणासी व चतुर्थ क्रमांक निळू फुले कला अकादमी यांच्या संगीत दृष्टांत या नाटकासाठी अनुक्रमे 21 हजार व 11 हजार रुपय, चषक व सन्मान पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी  उपसरपंच विकास सावंत, चेअरमन अशोक मुळे, उपायुक्त भालचंद्र मूळे, माजी सरपंच विठ्ठल सरडे, गोपीचंद बेलोटे, बाबुराव मूळे, दत्तात्रय बेलोटे, जगन्नाथ बेलोटे, कार्याध्यक्ष बाबुराव बेलोटे, शरद बोरुडे, दीपक मुळे, कमलाकर बेलोटे, सचिव धनेश भंडारी, दिनेश गायकवाड, संदीप मुळे, सचिन जाधव, कैलास बेलोटे, गणेश साळवे, भाऊसाहेब बेलोटे, ताराचंद गाजरे उपस्थित होते.
कन्हैय्या दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके म्हणाले की, अनेक वर्षापासून नाट्यस्पर्धा आयोजन देवीभोयरे ग्रामस्थ करीत असतात चांगला प्रतिसाद मिळत असतो. शिवाय ग्रामीण नाट्य कलाकारांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळत असते. नाट्यकलेविषयी एक समाजजागृती होत असते म्हणून हा उपक्रम कौतुकास्पद असून याबद्दल देवीभोयरे ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.