Breaking News

बाबावाडीतील मुलांना खाऊसह किराणा भेट

अहमदनगर/प्रतिनिधी
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी यांचे शिष्य प्रवीणऋषीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आनंदतीर्थ महिला परिषदेच्या वतीने नगरमधील वंचित मुलांच्या बाबावाडी येथे मुलांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच संस्थेस एक महिन्याचा किराणा भेट देण्यात आला.
या कार्यक्रमास डॉ.प्रीती फिरोदिया, स्वाती बोरा, सपना कटारिया, दीपाली भळगट, योगिता चंगेडे, मीना पितळे, प्रभावती मुथा, स्वाती कटारिया, तृप्ती देसरडा, सागर देसरडा, नेहा भंडारी, दीपा देसरडा, नीता पितळे आदी उपस्थित होत्या. यावेळी प्रभावती मुथा यांनी उपस्थित मुलांशी हसतखेळत संवाद साधत विविध गोष्टी सांगितल्या.
यावेळी प्रभावती मुथा म्हणाल्या, “ प्रविणऋषीजींनी अतिशय मौलिक व जीवनाला दिशा देणारे विचार देत असतात. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात चातुर्मास होण्यासाठी देशभरातून त्यांना विनंती येत असते. नगरमधील गर्भसंस्कार प्रकल्प त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या कार्यरत आहे. याशिवाय आचार्यश्रींच्या जन्मभूमीत पूज्य प्रविणऋषीजींच्या मार्गदर्शनाखालीच  आनंदतीर्थाची उभारणी वेगाने सुरु आहे. प्रवीणऋषीजींच्या प्रेरणेतून भविष्यातही समाजातील गोरगरीब, दीन-दुबळे, वंचितांसाठी आम्ही कार्यरत राहू, असे त्यांनी सांगितले.