Breaking News

वैद्य कासार यांना ‘टॅलेंट ऑफ अहमदनगर’ अ‍ॅवॉर्ड

अहमदनगर/प्रतिनिधी
आयुर्वेदिक क्षेत्रात काम करणार्‍या व समाजबांधवांना मोफत आरोग्य सेवा देणारे वैद्य राजेश कासार यांना भारत सरकार संलग्न नेहरू युवा केंद्र, दि युनिर्व्हसल फौंडेशन व राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ, नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय टॅलेंट ऑफ अहमदनगर जिल्हास्तरीय पुरस्कार येथील वैद्य राजेश कासार यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी आयोजकांना मोठ्या संख्येने प्रस्ताव  मिळाले होते. त्यातील वाळकी येथील वैद्य राजेश कासार यांची संयोजक समितीने निवड केली. बंधन लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी अभिनेत्री नियती घोडके, ज्येष्ठ पत्रकार अशोक सोनवणे, महिला बालविकास प्रकल्पाधिकारी संध्या देशमुख, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, डॉ. अमोल बागूल, मायाताई जाधव, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने, अ‍ॅड. धनंजय जाधव, सागर आलचेट्टी, आदिती उंडे, अ‍ॅड. पुष्पा जेजूरकर, अ‍ॅड.प्रणाली चव्हाण, अ‍ॅड. सुनील तोडकर, रजनी ताठे, शरद वाघमारे, अ‍ॅड. गौरी सामलेटी आदी उपस्थित होते.
वैद्य राजेश कासार गेल्या अनेक वर्षांपासून शहरी व ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा देत आहेत. गोरगरीब, गरजू रुग्णांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार करून अनेकांना व्याधीमुक्त केले आहे. या अगोदरही त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वैद्य राजेश कासार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे नवनाथ भाबड, तात्याराम भालसिंग, अतूल भालसिंग, महेश टांगळ, अशोक कासार, डॉ. साळवे, राजू भालसिंग, बाजीराव बोठेे, राजू कदम आदींनी अभिनंदन केले आहे.