Breaking News

फुकाचे श्रेय लाटणाऱ्या कथित नामदारांसाठी...!

कारखाना उभा करतांना राजकारणात समाजकारणात पत असलेल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना छल कपटाने राजकारणातून बाजूला फेकले. कधी कुणाशी मैञीचा हात पुढे करून तर  कुणाशी दगाबाजी करून. या तालुक्याचे पहिले आमदार का.दत्ता देशमुख, पाठोपाठ आमदार आणि मंञी झालेले बि. जे. खताळ पाटील या मंडळींनी तालुक्यात पेरलेल्या विकासाच्या  पिठावर थोरातांनी आयत्या रेषा ओढून आपले नाव कोरले.आणि कथित नामदारांनी तर हे पीठच आपल्या घरात नेऊन ठेवले. देशमुख, खताळ, दुर्वे नाना या भुमीपुञांवर संगमनेर  तालुक्यातील जनतेचा विश्वास होता.त्यांच्या शब्दाला प्रमाण मानून या तालुक्यातील लोकांनी पदरमोड करून, उपाशी राहून, बायकोचे मंगळसूत्र मोडून कारखाना उभा करायला पैसे दिले   होते. कारखाना हा तालुक्यातील लोकांच्या घामाच्या पैशावर उभा राहिलेला आहे, त्यासाठी साहेबांनी आपल्या घरातून किती पैसे दिले याचा हिशेब संगमनेरकरांना मिळाला तर आणखी   पस्तीस वर्ष सर्व प्रकारच्या निवडणुका संगमनेरकर नामदार कुटूंबाच्या नावावर करतील एव्हढे भोळे आणि दिलदार आहेत संगमनेरकर.
1958 मध्ये संगमनेरला सहकारी तत्त्वावर साखर कारखाना काढण्याचे ठरले. कारखान्याचे चीफ प्रमोटर म्हणून स्व बी. जे. खताळ पाटील का.दत्ता देशमुख भास्करराव दुर्वे, पंढरीनाथ  आंबरे, दत्ताजी मोरे यांच्यासोबत भाऊसाहेब थोरात या मंडळींनी भागभांडवल गोळा करायला सुरूवात केली. संपूर्ण तालुका सहकारी साखर कारखान्याच्या कल्पनेने भारावून गेला. त्या  काळात सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेली इतर बरीच मंडळी कारखाना उभाहेणीच्या चळवळीत सहभागी होती. होती. या सर्वांच्या साथीने अवघ्या सात दिवसात 18 लक्ष  रूपयांचे भागभांडवल गोळा करण्यात आले. काही विघ्नसंतोषी मंडळी कारखाना उभारणीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी भागभांडवल म्हणून दिलेली शेअर्सची रक्कम परत मागावी यासाठी  फूस लावीत होती. मात्र संगमनेरच्या या भुमी पुञांनी आपल्या निर्धारावर ठाम राहून अनंत अडचणींवर मात करून पुढे जवळपास दहा वर्षांनी संगमनेर सहकारी साखर कारखाना उभा  केला. हा इतिहास याठिकाणी प्रस्तुत करण्याचे कारण एव्हढेच की संगमनेरच्या अनेकानेक भुमीपुञांनी हा साखर कारखाना उभा करण्यासाठी आपली उमेद खर्च केली,त्या कुणा एकानेही  कारखाना उभारण्याचे श्रेय लाटून अवघा तालुका कुटूंबाची जहागीरी बनविण्याचे स्वप्न पाहीले नाही.अपवाद केवळ कथित नामदारांचे पिताश्री.कारखाना उभा करतांना राजकारणात  समाजकारणात पत असलेल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना छल कपटाने राजकारणातून बाजूला फेकले.कधी कुणाशी मैञीचा हात पुढे करून तर कुणाशी दगाबाजी करून.या तालुक्याचे  पहिले आमदार का.दत्ता देशमुख,पाठोपाठ आमदार आणि मंञी झालेले बि. जे. खताळ पाटील या मंडळींनी तालुक्यात पेरलेल्या विकासाच्या पिठावर थोरातांनी आयत्या रेषा ओढून  आपले नाव कोरले.आणि कथित नामदारांनी तर हे पीठच आपल्या घरात नेऊन ठेवले.
देशमुख, खताळ, दुर्वे नाना या भुमीपुञांवर संगमनेर तालुक्यातील जनतेचा विश्वास होता. त्यांच्या शब्दाला प्रमाण मानून या तालुक्यातील लोकांनी पदरमोड करून, उपाशी राहून, बायकोचे मंगळसूत्र मोडून कारखाना उभा करायला पैसे दिले होते. कारखाना हा तालुक्यातील लोकांच्या घामाच्या पैशावर उभा राहिलेला आहे, त्यासाठी साहेबांनी आपल्या घरातून किती  पैसे दिले याचा हिशेब संगमनेरकरांना मिळाला तर आणखी पस्तीस वर्ष सर्व प्रकारच्या निवडणुका संगमनेरकर नामदार कुटूंबाच्या नावावर करतील एव्हढे भोळे आणि दिलदार आहेत संगमनेरकर.

पण हिशेब देणार कसा?
दुसऱ्या बाजुला सह्याद्री शिक्षण संस्था, दुधसंघ, शम्प्रो, मेडीकल कालेज, अभियांञीकी कालेज,पालिटेक्निक आणि साखर कारखाना अशा विविध संस्थांच्या माध्यमातून हजारो कर्मचाऱ्यांच्या घरच्या चुली चालवतो अशी फुशारकी मारली जातेयात जगावेगळे काय आहे.आपले कारखाने, संस्था चालवायच्या तर त्याला कर्मचारी लागणार ना? त्यांच्या चुली फुकट  चालवता का? आणि आपण हा जो विकास दाखवता त्याचे मुळ साखर कारखान्यात आहे.कारखाना सुस्थित चालत होता म्हणून आपण हे सारे उभे केले.त्याचे श्रेय कारखाना उभे करणारे  ते भुमीपुञ आणि तालुक्याच्या जनतेचे आहे. तुम्ही फुकाचे श्रेय लाटू नका.सकाळी 9 ते 6 पर्यंत तो बिचारा कर्मचारी कारखाना व संस्थेत राबतो. त्याच्या घामाचे मोल म्हणून त्याला  पगार मिळतो. त्या पगारातुनही तुमच्या सोहळे आणि वाढदिवसाला पैसे कापले जातात. कर्मचाऱ्यांना पगार देऊन त्यांचे घर चालवतो ही उपकाराची भाषा बोलताना साहेबांच्या बगलबच्चांना जराही शरम वाटू नये. शेतकऱ्यांचा पैसा वापरुन कारखाना उभा केला, उसाच्या पेमेंटमधून पैसे कापून संस्था उभा राहिल्या. जिथे डोनेशन शिवाय शेतकऱ्यांच्या मुलाला  ऍडमिशन मिळत नाही. याच कारखाना व संस्थेच्या माध्यमातून घोटाळे करून साहेबांनी आपले खाजगी व्यवसाय उभे केले, देशात आणि परदेशात मालमत्ता घेतल्या, चहाचे मळे विकत  घेतले, दारूची फॅक्टरी टाकली, पंजाबी जावयाला व्यवसाय टाकून दिले आणि हजारो कोटींची खाजगी संपत्ती स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने गोळा केली.साहेब, साहेबांची मुले, साहेबांच्या  सुना, साहेबांचे नातू हे सगळे आलिशान आणि करोडो रुपयांच्या महागड्या गाडीत फिरतात. त्या गाड्यांमधील डिझेल देखील कारखान्याच्या पेट्रोल पंपातून टाकले जाते, ज्याचे पैसे  शेतकऱ्यांना उसाच्या बिलातून द्यावे लागते. मात्र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी अक्षरशः आपल्या बायकोच्या गळ्यातले मंगळसूत्र विकून कारखाना उभा केला त्या शेतकऱ्यांच्या वाटेला  आज काय आहे.? त्या शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात येतो तेव्हा त्याचा काटा मारला जातो, अनेकांकडे आज देखील साधी मोटारसायकल सुद्धा नाही, ज्यांच्याकडे आहे त्यापैकी अनेकजण  आजही स्वतः च्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी महाग आहेत. साहेब तुमचे कुटुंब मात्र ऐषोआरामात आहे. मग एक प्रश्नाचे उत्तर द्या साहेब, कारखाना उभा करून तालुक्यातील  शेतकऱ्यांनी तुमच्यावर उपकार केले की तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपकार केले.? आपण काय केलत? कारखाना उभा करणाऱ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. दत्ता देशमुख   खताळ पाटी भास्कर नाना आदींना प्रवाहातून बाजूला काढले. कायखान्याला पिताश्रींचे नाव.या भुमीपुञांच्या पुढच्या पिढीलाही साधा सन्मानाचे दोन शब्द नाहीत.हीच आपली कार्यशैली.  सत्य नेहमी कटू असते पण ते सत्यच असते साहेब..