Breaking News

दुर्गा दौड रॅलीचे नेवासेनगरीत स्वागत

नेवासे/प्रतिनिधी
 नेवासे येथे विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने मातृ शक्ती व दुर्गा वाहिनीच्यावतीने दुर्गा दौड रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेवासे नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या दुर्गा दौड रॅलीत युवती महिला व बालिका पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या.स्रियांनी व युवतींनी कर्तव्य समजून राष्ट्रीय व धार्मिक कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन हभप मीराताई बांगर यांनी यावेळी बोलतांना केले.
मळगंगा देवी मंदिर प्रांगणात दुर्गा दौड रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी राहुरी येथील हभप मीराताई बांगर, विश्‍व हिंदू परिषदेचे राहुरी येथील उद्योजक डॉ.भोंगळ, हभप बहिरट महाराज, जिल्हा संघ चालक निमसे, प्रांत धर्म जागरणचे विठ्ठलराव शिंदे, कोंडेकर काका, अनंतराव नळकांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्गा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी निघालेल्या दुर्गा दौडमध्ये बालिका युवती व महिला भगिनींनी हम भारत की, नारी है, फुल नही चिंगारी है अशा घोषणा देत सहभाग नोंदवला. मुख्य रस्त्यावर सदरची रॅली घोषणा देत मळगंगा देवी मंदिर प्रांगणात गेली. तेथे हभप मिराताई बांगर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी देविभक्त सुमनताई घोलप या होत्या.
स्रियांनी व युवतींनी कर्तव्य समजून राष्ट्रीय व धार्मिक कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन हभप मीराताई बांगर यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी कावेरी मापारी, रुपाली मापारी, अमृताताई नळकांडे, माधुरी शेटे, मोहिनी डहाळे यांच्यासह महिला युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.