Breaking News

मराठमोळा पैलवान राहुल आवारेचा साखरपुडा

मुंबई/प्रतिनिधी
जागतिक कुस्ती स्पर्धेतला कांस्यपदक विजेता पैलवान राहुल आवारे आणि ऐश्‍वर्या पवार यांचा साखरपुडा पुण्यात संपन्न झाल ऐश्‍वर्या ही राहुलचे वस्ताद आणि भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार यांची कन्या आहे. राहुल आवारेनं इतिहास घडवत नुकतेच जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा तो महाराष्ट्राचा पहिला पैलवान ठरलाय. महाराष्ट्राची कुस्ती गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र केसरीच्या गवगव्यातच अडकली असतानाच राहुल आवारेनं आंतरराष्ट्रीय कुस्तीत यश मिळवता येतं हे महाराष्ट्राच्या पैलवानांना दाखवून दिलं आहे. 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं सोनेरी यश संपादन केलं होतं.