Breaking News

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी काढला पळ; सलमान खुर्शीद

Salman Khurshid
नवी दिल्ली
सलग दुसर्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. 2019मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणूक लढवली होती आणि काँग्रेसचा पुन्हा पराभव झाला. या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. सर्वांनी त्यांना पदावर राहण्याचा आग्रह केल्यानंतर देखील राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम होते. अखेर काँग्रेसला पुन्हा एकदा सोनिया गांधींकडे पक्षाची सूत्रे द्यावी लागली. लोकसभा निवडणुकीला 5 महिने झाले तरी काँग्रेस पक्ष अद्याप गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अशातच काँग्रेसच्या एका नेत्याने थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांवर अशा पद्धतीने थेट टीका होण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने आत्मपरिक्षण देखील केले नाही. आमचा सर्वात मोठा प्रश्‍न हाच आहे की, आमच्या नेत्यांनी जबाबदारीपासून पळ काढला, असे वक्तव्य पक्षातील वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत खुर्शीद यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील पराभानंतर राहुल गांधींनी दिलेल्या राजीनाम्यामुळे संकट आणखी वाढली आहेत. पक्षाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे, आम्ही निवडणूक का हारलो याचे विश्‍लेषणासाठी देखील एकत्र आलो नाही. कारण आमचे नेतेच आम्हाला सोडून गेले.

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर प्रथमच पक्षातील नेत्याने त्यांनी पळ काढला असा शब्द वापरला आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे एक रिक्तपणा आला आहे. हे संकट आणखी वाढताना दिसत आहे जेव्हा सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाचे पुन्हा नेतृत्व देण्यात आले, असे खुर्शीद म्हणाले. मला इच्छा नव्हती की, राहुल गांधी यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी पदावर कायम रहायला हवे होते. केवळ मीच नाही तर कार्यकर्त्यांना देखील असेच वाटत होते की त्यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारले आहे. पण ती एक अस्थायी व्यवस्था आहे. मला वाटते की असे असू नये.

दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परदेशी दौर्‍यावर गेल्यामुळे चर्चेत आले होते. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच राहुल गांधी ध्यान करण्यासाठी परदेशात केल्याचे वृत्त समोर आल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आता थेट पक्षातील नेत्याने त्यांच्यावर टीका केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील गटबाजीमुळे नाराज होत राहुल गांधी परदेशी दौर्‍यावर केल्याचे कळते., स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत भारताची मोठी घसरण