Breaking News

सुंदर मुलींनी अधिकार्‍यांना अडकवल जाळ्यात: तयार केले अश्‍लील व्हिडीओ

भोपाळ
मध्य प्रदेशातल्या हनी ट्रॅप प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलंय. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या डखढने आता मंत्रालयातल्या चार विभागांना आपल्या रडारवर ठेवलं आहे. कृषी मंत्रालयासहीत महत्त्वाच्या अन्य तीन मंत्रालयांमध्ये या माध्यमातून कोट्यवधींचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी ज्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते त्यांच्या घरातून पोलिसांनी अनेक फाईल्स जप्त केल्या आहेत. त्या फाईल्समध्ये अनेक धक्कादायक माहिती आढळून आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. केपशू ढीरि मधल्या मुलींनी विविध विभागांमधल्या अधिकार्‍यांना आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांचे व्हिडीओ तयार करून त्यांच्याकडून अनेक कामं करून घेतली. कंत्राटं मिळवणं, बदल्या करून घेणं आणि अनेक अवैध काम या माध्यमातून झाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

असं आहे प्रकरण

सर्व देशभर गाजत असलेल्या मध्य प्रदेशातल्या केपशू ढीरि प्रकरणाने प्रचंड खळबळ उडालीय. या प्रकरणात आता दररोज नव नवे खुलासे होत आहेत. यात अनेक गोष्टी पुढे येत असून त्यातून धक्कादायक माहिती बाहेर येतेय. ही माहीती अतिशय स्फोटक असून त्यातून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या माहितीने अनेक बड्या आसामी अडचणीत येण्याचीही शक्यता आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगडसह दिल्लीतही या रॅकेटची पाळमुळं असल्याची माहिती पुढे येत असल्याने पोलिसांच्या हाती स्फोटक माहिती आलीय. मध्य प्रदेश पोलिसांनी आता तिसरं रेक्स रॅकेट पकडल्याचा दावा केलाय. यातल्या आरोपींकडूनही खळबळजनक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात या आधी हनी ट्रॅपच्या दोन मोठ्या गँगचा पर्दाफाश झाला होता. यामुळे देशभर प्रचंड खळबळ उडाली होती. याची चर्चा सुरू असतानाच आता तीसर्‍या गँगचाही पर्दाफाश झाला असून अजुन अशा किती गँग आहेत असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. इंदूर इथून पहिल्या गँगला अटक करण्यात आली. नंतर भोपाळच्या निशातपूरा या भागात दुसरी गँग सापडली तर आता कोलार विभागात तिसरी गँग सापडली आहे. या प्रकरणात माहिती मिळाल्यावर पोलिसांनी संशयास्पद घरावर छापा घातला यात काही तरुणी आणि तरुण आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले आहेत. पोलिसांच्या विशेष पथकाने 11 जणांना अटक केलीय.

पहिलं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना( SIT) केली होती. या पथकाने आत्तापर्यंतच्या छाप्यांमध्ये या गँगकडून तब्बल 4 हजार  जप्त करण्यात आल्या आहेत.  यात  अत्यंत आक्षपार्ह फोटो असल्याची माहिती SIT  दिली आहे. या छाप्यात काही डायर्‍याही सापडल्या असून त्यात कोडवर्ड्समध्ये अधिकार्‍यांची नावं देण्यात आली आहेत.