Breaking News

नवरात्रोत्सवातून जोपासावा सामाजिक एकोपा:ठुबे

 पारनेर/प्रतिनिधी
 भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरा करण्याची मोठी परंपरा आहे. शारदीय नवरात्र उत्सव देशात मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक् एकोपा राखण्याचा संकल्प करावा असे प्रतिपादन जि. प. सदस्या उज्वला ठुबे यांनी केले.

   करंदी (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र मळगंगा देवी देवस्थान ट्रस्ट आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेच्या महाआरतीचा मान उज्वला ठुबे, कान्हूरपठारचे सरपंच अलंकार काकडे, पत्रकार सतिष ठुबे, पत्रकार भास्कर पोपळघट याना देण्यात आला होता. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी परिसरातील भाविकानी मोठी गर्दी केली होती.

   ठुबे पुढे बोलताना म्हणाल्या की समाज व्यसनामुळे लयाला गेला आहे. महिलावरील आत्याचार वाढले आहेत. या मुळे समाजाची सामाजिक शांतता लोप पावत आहेत. याकरिता नवरात्री निमत्त चांगला माणूस घडविण्यासाठी संकल्प करा. यावेळी पाचव्या माळेचे महाफराळाचे अन्नदान कमल ठाणगे, गणेश ठुबे, दत्ता ठाणगे, लखन ठाणगे, आनंदा ठाणगे, पुंडलिक गांगड, सोन्याबापू ठाणगे, झुंबरबाई शिंदे, भिमाजी तांबे, दगडू ठुबे, जीवन जाधव, विजय झावरे यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्याक्ष सदानंद गव्हाणे, सचिव शिवाजी ठाणगे, विश्वस्त सावळेराम ठाणगे, तंटामुक्ती अध्यक्ष राधुजी ठाणगे, दत्तोबा ठाणगे, संतोष ठाणगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.