Breaking News

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक, गाड्यांचं नुकसान

औरंगाबाद
औरंगाबादमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. जाधव यांच्या समर्थनगर भागातील घरावर मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी हर्षवर्धन जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि घरावर दगडफेक केली. हल्ला झाला त्यावेळी हर्षवर्धन जाधव घरी नव्हते. प्रचारासाठी ते कन्नडमध्ये आहेत.मध्यरात्री तीन ते चार तरुण बाईकवरुन आले आणि त्यांनी गेटबाहेरुन दगडफेक केली. या घटनेत जाधव यांच्या दोन गाड्यांचं नुकसान झालं.  दरम्यान हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिस चौकशी सुरु आहे."दगडफेक करताना आरोपींनी 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणाही दिल्या," असं हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी सांगितलं. "ही अतिशय दुर्दैवी घटना असून समोरासमोर सामना करावा, पाठीमागून हल्ला करु नये. जय भवानी, जय शिवाजी म्हणतो, त्यावेळी शिवरायांची शिकवण पाळावी, पराभव समोर दिसत असल्याने ही गुंडगिरी सुरु आहे,"
असही संजना जाधव म्हणाल्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते. तेव्हापासून त्यांनी शिवसैनिकांची नाराजी ओढावून घेतली.