Breaking News

पवार कुटुंबातील तरुणांना भाजपाचे दरवाजे खुले

pawar Family
पुणे
भविष्यात जर पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये येणार असेल तर त्याचं आश्‍चर्य वाटू देऊ नका असं भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ’काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नेते थकले आणि नवीन पिढी पक्षात थांबायला तयार नाही. त्यामुळे भविष्यात पवारांच्या घरातलं कुणी पक्षात आलं तर आश्‍चर्य नको’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तरुण तडफदार असतील आणि त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल तर आमचे दरवाजे खुलेच राहणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, युतीमध्ये मुख्यमंत्री पद कोणाला दिलं यावर विचारलं असता पुढचा मुख्यमंत्री कोण हे अद्याप ठरलेलं नाही. ते निवडणुकांनंतर ठरेल. मात्र, मला मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले

चंद्रकांत पाटील म्हणाले
- पुण्यातील पाणीकपात ,वाहतूक कोंडी ,कचरा कोंडी,नदीपात्रातील रस्ता हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्याचा पाठपुरावा करणार
- टोचून बोलणे ही फक्त पुणेरी वृत्ती नाही ती सगळीकडे आहे.
- निवडणुकीत जात येणं दुर्दैवी
- मराठा का जैन, उमेदवार ब्राम्हण का नाही
- हे चित्र बदलायला 5, 10 वर्षे लागतील
- मी कुणाच्याही उचकवण्यामुळे निवडणूक लढवत नाहीये
- कोथरुड सुरक्षित आहे असं वाटत असेल तर विरोधकांनी घरी बसावं
- तुम्हाला उमेदवार मिळेना
- घटक पक्ष नसताना मनसेला पाठिंबा दिला
- तुमच्यात लढण्याची हिम्मत नाही म्हणून मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवावी लागल
- राज ठाकरे यांची जुनी ओळख आहे. मात्र, ते स्वतः चा वापर करू देणार नाहीत असं वाटत होतं