Breaking News

सरंजामशहांच्या कुबड्या घेण्याची वेळ का आली ?

मुळ प्रश्‍नांना बगल देऊन राष्ट्रीय अस्मितेचे कातडे पांघरलेले हे राष्ट्रप्रेमी जनभावनांशी खेळत आहेत. लोकांसमोर जाऊन स्थानिक विकासावर मत मागण्याचे धाडस सत्ताधार्‍यांमध्ये उरले नाही म्हणून विविध मतदार  संघातील सरंजामशाहीच्या कुबड्या घेण्याची वेळ सत्ता पक्षावर आली आहे. सत्ताधार्‍यां च्या हेतूतच काहीतरी खोट आहे आणि त्याची जाणीव नेत्यांना होऊ लागली की अशा कुबड्या घेण्याची उपरती होते.भाजपाची  आवस्था अशीच काहीशी झाल्यासारखी परिस्थिती आहे म्हणूनच गावोगावच्या सरंजामांना आपल्या पक्षात घेऊन विधानसभेच्या मैदानावरील कुस्ती मारावी लागत आहे. अनेक गोष्टी जनतेच्या लक्षात आल्या आहेत.  याची जाणीव झाल्यानेच उपरे उमेदवार घेऊन भाजपा निवडणूक लढवून जिंकण्याची भाषा करीत आहेत.निवडून येणारे बहुतेक काँग्रेस राष्ट्रवादीच्य मुशीत तयार झालेले असतील, म्हणूनच महिनाभरापुर्वी सरकार कु णाचेही येवो, मंत्री आमचेच असे सुप्रीया सुळे यांनी म्हटले होते.त्यात काही वावगे नाही.
भारतीय जनता पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येईल, अशी गर्वाची भाषा प्रमुख नेत्यांच्या तोंडून गेल्या काही दिवसापासून बाहेर पडत आहे.या भाषेला सत्तेचा उग्र दर्प आणि दांभिकपणा आहे.सत्तेचा माज त्यांच्या  प्रत्येक शब्दात दिसतो आहे. दांडगी शरीरयष्टी दिसणार्‍या माणसाने कसलेल्या पहिलवानाला आव्हान द्याव आणि दुसर्‍याच  डावात धापा टाकाव्यात तेंव्हा शरीर भुसभुशीत झाल्याची जाणीव होते. विविध प्रकारच्या  विषाणूंनी अशा स्वयंघोषीत पहिलवानाचे शरीर पोखरावे तशी भारतीय जनता पक्षाची अवास्था झाली आहे. सत्तेच्या लोभाने राजकारणातील अनेक विषाणू भाजपात सामील झाल्याने हा पक्ष सुजल्यासारखा दिसत  आहे.माञ ही सुज जेव्हढ्या वेगाने चढली त्यापेक्षाही उतरेल आणि त्यासाठी हेच राजकीय विषाणू कार्यरत असल्याचे दिसेल. मुळात गेली पाच वर्ष देशावर निरंकूश सत्ता गाजवल्यानंतर निवडणूकीला सामोरे जाताना  कुणाच्या मदतीच्या कुबड्या घेण्याची गरज कुठल्याही राजकीय पक्षाला पडू नये. मात्र सत्ताधार्‍यांच्या हेतूतच काहीतरी खोट आहे आणि त्याची जाणीव नेत्यांना होऊ लागली की अशा कुबड्या घेण्याची उपरती  होते.भाजपाची आवस्था अशीच काहीशी झाल्यासारखी परिस्थिती आहे म्हणूनच गावोगावच्या सरंजामांना आपल्या पक्षात घेऊन विधानसभेच्या मैदानावरील कुस्ती मारावी लागत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीचे चिञ पाहील्यानंतर कोण कुणाच्या सोबत आहे याचा पत्ता संंबंधितांच्या घरवाल्यांनाही लागत नाही. निकाल लागल्यानंतर यापेक्षा भयानक अवस्था झाली तर आश्‍चर्य वाटणार  नाही.भाजपाकडे वर्षानुवर्ष निष्ठा जपणारे नेते कार्यकर्ते आहेत.त्यांना बाजूला सारून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध मतदार संघाच्या बिळावर वेटोळे घालून बसलेल्या नागोबांना संधी दिली जात आहे.एकुण सेना  भाजपा निवडणूक लढवित असलेल्या 288 जागांवर किती ठिकाणी पक्षाच्या मुळ कार्यकर्त्याला संधी दिली गेली? या प्रश्‍नाचे उत्तर मिळवल्यानंतर भाजपाचा दावा सपशेल फोल ठरतो. भाजपाला त्यांनी दावा के ल्याप्रमाणे पुर्ण बहुमत मिळाले जरी, तरी ते त्यांचे यश असणार नाही.विविध पक्षांतून भाजपात आलेले कातडी बचावखोर यांच्या पुण्याईचे ते यश असणार असल्यामुळे भाजपाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून मतं  टाकली. 56 इंजाच्या छातीला मतदान झाले, कलम 370, सर्जीकल स्ट्राईक वगैरे वगैरे याच्याशी स्थानिक जनतेला काही सोयरं सुतक नाही.हे राष्ट्रीय प्रश्‍न आहेत. भारताच्या प्रत्येक नागरीकाला  राष्ट्रीय अस्मिता  आहेच.केवळ भाजपेयींनी अस्मितेचा मक्ता घेतलेला नाही. आज अनेक मतदारसंघामध्ये लोकांचे विविध प्रश्‍न ऐरणीवर आहेत. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे.रोजगाराचा प्रश्‍न भिषण बनला आहे.शेतकरी हैराण झाला  आहे. उद्योग धंदे बंद पडत आहेत. जनावरेही व्याकूळ आहेत. अशा उपाशी पोटात संसदेत पारीत केलेल्या वटहुमांचे कागद घालणार का? मुळ प्रश्‍नांना बगल देऊन राष्ट्रीय अस्मितेचे कातडे पांघरलेले हे राष्ट्रप्रेमी  जनभावनांशी खेळत आहेत. लोकांसमोर जाऊन स्थानिक विकासावर मत मागण्याचे धाडस सत्ताधार्‍यांमध्ये उरले नाही म्हणून विविध मतदार संघातील सरंजामशाहीच्या कुबड्या घेण्याची वेळ सत्ता पक्षावर आली  आहे.
आपले पाच वर्षाचे पाप झाकण्यासाठी सत्ताधिश आणि सरंजामशहांनी आपल्या चलतीच्या काळात मतदार संघात घातलेला हैदोस या अभद्र युतीने ही निवडणूक वेठीस धरली आहे. निवडून येण्याचे कथित निकष  लावून सत्तापक्षाने अन्य पक्षातील सामर्थशील नेत्यांना प्रवेश दिला खरा पण आपल्याच नेत्यांवर अन्याय केला. यात अनेक दिग्गज जे पक्षाशी एकनिष्ठ होते त्यांची नावे घेता येतील. एकनाथ खडसेंचे नाव तर  जगजाहीर आहे. मात्र उर्जा मंञी चंद्रकांत बावनकुळे यांनाही डावलण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. बावनकुळेंना डावालण्यामागे मोठे षडयंञ असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या  दोन्ही हेवीवेट नेत्यांचा निकटवर्तीय, आतल्या गोटातील म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर बावनकुळेंचे विधानसभेचे तिकीट कापले गेल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. शेवटच्या क्षणापर्यंत फडणवीस आणि गडक रींनी अमित शहांना गळ घातली.तरीही बावनकुळेना तिकीट मिळु शकले नाही, शेवटी बावनकुळेंना नको तर त्यांच्या पत्नीला तरी तिकीट द्या म्हणून मुख्यमंत्र्यांनी लॉबिंग केले, पण त्यांना कडक आणि स्पष्ट शब्दात  नकार कळविण्यात आला आणि पुन्हा या प्रकरणी चर्चा न करण्याची सक्त तंबीच अमित शहांनी फडणवीसांना दिल्याची चर्चा आहे. कार्यक्षम मंत्री असा नावलौकिक असलेल्या बावनकुळेंबाबत असा दृष्टीकोन का  धारण केला असावा या बाबत तर्क वितर्क सुरु आहेत.
 गेल्यावर्षी  ऑगस्ट 2018 पासुन मुंबईत व विशेषत ः मुंबई उपनगरात विजेच्या बिलांमध्ये अचानक दुप्पट तिप्पट वाढ झाली, योगायोगाने त्याच महिन्यापासुन तेथील वीज पुरवठ्याचे काम हे अदानी पॉवरला  देण्यात आले होते. जनतेने याविरुद्ध बोंब उठवली पण नेहमीप्रमाणे सरकारने तिकडे लक्षच दिले नाही. पण ऊर्जामंत्री असलेल्या बावनकुळेंना याप्रकरणातील मेख लक्षात आली होती.त्यांचीही महत्वाकांक्षा जागी  झाली असावी अदाणी पावरने आपल्यालाही मर्जी दाखवावी   असा तगादा लावला.  अमित शहा आणि भाजपा उच्यपदस्थांचे अदानी हे खासम खास. बावनकुळेंंची डाळ शिजली नाही. दबाव आणखी वाढविण्यासाठी  बावनकुळेंनी राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली (कारण कायद्यानुसार राज्य वीज नियामक आयोगाच्या परवानगीशिवाय वीज दर आणि वीजबिल यात एका पैशाचीही  वाढ करता येत नाही). या समितीने 24 लाख बिलांची तपासणी केली आणि अतिशय धक्कादायक बाब समोर आली. अदानी पॉवर ने सर्व वीज ग्राहकांना अंदाजे म्हणजेच रिडींग न घेता दुप्पट तिप्पट बिले पाठवली  होती. ग्राहकांना न वापरलेल्या विजेचे बिल भरावे लागत होते. विशेष म्हणजे अडाणी पॉवर अश्याप्रकारे दर महिन्याला 1800 ते 2000 कोटी अतिरिक्त वसुल करत आहे, असे या अहवलात नमुद आहे. आता  बावनकुळेंनी त्या अहवलाआधारे अदानीला  खिंडीत गाठले. दिल्लीतुन नंबर दोनच्या नेत्याने कडक समज देण्यासाठी दिल्लीत बोलावून घेतले, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांची कानउघाडणीही करण्यात आली.  त्यानंतर हे प्रकरण थंड पडले, अदानी पॉवरचे कारस्थान सुरूच राहीले.  बावनकुळे अदानी आणि अमित शहा यांच्या पक्के डोक्यात बसले होते, या माणसाला राजकारणातच ठेवायच नाही असा चंगच बांधण्यात  आला. म्हणून गेल्या 4 वेळेपासुन कोणत्याही लाटेविना निवडुन येत असलेल्या या बहुजन समाजाच्या नेत्याला तिकीट नाकारण्यात आले. अगदी सीएम आणि गडकरी यांनी अंतिम क्षणापर्यंत प्रतिष्ठेचं करूनही तिकीट  नाकारण्यात आले.हा आहे भाजपाचा अजेंडा. या सारख्या अनेक गोष्टी जनतेच्या लक्षात आल्या आहेत.याची जाणीव झाल्यानेच उपरे उमेदवार घेऊन भाजपा निवडणूक लढवून जिंकण्याची भाषा करीत आहेत.निवडून  येणारे बहुतेक काँग्रेस राष्ट्रवादीच्य मुशीत तयार झालेले असतील, म्हणूनच महिनाभरापुर्वी सरकार कुणाचेही येवो, मंत्री आमचेच असे सुप्रीया सुळे यांनी म्हटले होते. त्यात काही वावगे नाही.