Breaking News

चिमुकलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत पार्कमध्ये सापडली

Crime
बिलासपूर
दोन वेगवेगळ्या सामूहिक बलात्काराच्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर इथे चिमुकलीला गुंगीचं औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला तर दुसरीकडे मध्य प्रदेशात भोपाळमध्ये 20 वर्षांच्या युवतीवर सफाई कर्मचार्‍यांनी सामूहिक बलात्कार केला. या दोन्ही घटनांमुळे मोठी खळबळ माजली असून पोलिसांकडून दोन्ही प्रकरणी तपास सुरू आहे.

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर इथे चिमुकलीवर रेस्टॉरंटमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बिलासपूर जिल्हा मुख्यालयासमोरील गावातून पीडितेचं अपहरण करून तिला रेस्टॉरंटमध्ये नेण्यात आलं आणि तिथे आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून चिमुकलीवर बलात्कार केला. दरम्यान या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून कारवाई करण्यास तयार नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला.

पीडित चिमुकलीच्या वडिलांचा आरोप

पीडतेचे वडील नेपाळहून हिमाचल प्रदेशातील बिलासपूर इथे काही वर्षांपूर्वी कामानिमित्तानं आले होते. त्यांना तीन मुली आहेत. 6 ऑक्टोबर रोजी त्यांनी लहान मुलगी घरी न आल्यामुळे त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. रात्र उलटल्यानंतरही मुलीचा पत्ता नाही त्यामुळे त्यांचा जीव कासाविस झाला. वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार बिलासपूर-चंदीगड रस्त्यावर असलेल्या बार आणि रेस्टॉरंटमधील दोन कामगार आणि तरुणाने पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

दूधात गुंगीचं औषध

पीडितेला दुधातून गुंगीचं औषध देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. दुसर्‍या दिवशी पीडितेच्या वडिलांनी महिला पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगण्यास धाव घेतली तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल न घेताच त्यांना घरी पाठवून दिले. 24 तासांत या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई केली गेली नसल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. पीडितेचे वडिलांनी पोलिसांना जेव्हा सांगितलं की माझी मुलगी विवस्त्र आणि अत्यावस्थ अवस्थेत बस स्टॅण्डच्या मागच्या पार्कमध्ये मिळाली. त्यावर तुमची मुलगी मिळाली त्यामुळे याबाबत आता कोणतीही इतर कारवाई किंवा एफआयआर होणार नाही असं पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना उत्तर दिलं. हशात झालेले वडील पीडितेला घेऊन घरी परतले.

वडिलांनी वारंवर तक्रार आणि मेडिकल टेस्टची मागणी करूनही पोलिसांनी मात्र दखल घेतली नाही. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पंचायत प्रतिनिधी आणि चाइल्ड हेल्पलाईनवर संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांच्याकडे मदत मागितली. दरम्यान या प्रकरणी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा दखल घेत नसल्याचा आरोपही पीडितेच्या वडिलांनी केला. चाइल्ड हेल्पलाईनने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना एफआयआर दाखल करायला लावला खरा. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं कारण पोलिसांनी दिलं आहे. पीडितेवर सामूहिक बलात्कार करणारे नराधम अद्यापही खुलेआम फिरत आहेत. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली असून चौकशी सुरू आहे त्यानंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपाधिक्षक संजय शर्मा यांनी दिली आहे.