Breaking News

परमार्थाची उंची कमी होऊ देऊ नका : अकोलकर महाराज

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधी
सर्वच जातीधर्माच्या संतानी संत परंपरेला फार मोठे महत्व दिले आहे. धर्मकार्यात त्यांनी कधी जात आडवी येऊ दिली नाही. वेगवेगळ्या जातीधर्म संतानी ग्रंथरुपी ज्ञानसागराचे महान कार्य सामन्याच्या उद्धारासाठी करून ठेेवले आहे. मात्र, आजकालची परिस्थिती पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करून आपल्या संस्कृती पासून जातो. असे वातावरण सध्या पहावयास मिळत आहे. सर्वच साधु - संतानी परमार्थ हा उच्च कोटीला नेहुन ठेवला आहे. आता त्याची उंची कमी होऊ नये, यासाठी आपणाला कार्यकरण्याची गरज आहे. असे मत ह.भ.प. हरिभाऊ महाराज अकोलकर यांनी मांडले.
शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर येथे देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने व सुधाकर महाराज आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात पहिले. पुष्पगुंफताना अकोलकर महाराज बोलत होते.
सध्याच्या परिस्थितीवर मोबाईल व व्हॉटस्अ‍ॅपचा अतिरेक होतो आहे. विज्ञानाने गती प्राप्त झाली आहे. त्याचा उपयोग प्रगतीसाठी व्हावा. अधोगती नेणारा ठरू नये, अशी खंत यावेळी व्यक्त केली. यावेळी महेश महाराज शेळके, मच्छिद्र ढोले, रामहारी जाधव, भाऊसाहेब भोसले, मारूती सामृत, बहिरनाथ फाटके, उद्धव चुनखडे, अंबादास फाटके, दादा जाधव, नारायण आढाव, पाडुरंग आढाव, सोपान लांडे, बबन शेळके, राम हारी ढोरकुले, यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.