Breaking News

पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सलीमभाई पठाण

शेवगाव/प्रतिनिधी
निर्भीड पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी सलीमभाई पठाण यांची नियुक्ती महाराष्ट्र अध्यक्षा रुचिता रमण मलबारी यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्य व पत्रकारितेतील योगदान दिल्याबद्दल सदरची निवड करण्यात आली असल्याचे रुचिता मलबारी यांनी नियुक्तीत पत्रात म्हटले आहे.
निर्भीड पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी सक्षम करून त्यांचे संघटन जिल्ह्याभरात खेडोपाडी जाऊन करणार असल्याचे नियुक्तीनंतर जिल्हा अध्यक्ष सलिम पठाण यांनी सांगितले आहे.
निर्भीड पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी सलीमभाई पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे निर्भीड पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा सोनाली संतोष जाधव, सचिव दीपा कांचन शेटे, खजिनदार शकुंतला देविदास चिर्लेकर, संजना संतोष शेटे, सेक्रेटरी किर्ती कीरण शेटे, दिपाली दिपक जाधव तसेच शेवगाव तालुक्यातील रवी उगलमुगले, दादासाहेब डोंगरे या पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.