Breaking News

भिंगारमध्ये जखमी वळूकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष

भिंगार /प्रतिनिधी
येथील खळेवाडी भागातील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक अविनाश गुपते व  दत्तात्रय धकाते यांच्या घरासमोर गेल्या आठ दिवसांपासून एक जखमी वळू जखमी अवस्थेत पडलेला असून त्याच्याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही. वळू आजारी असल्यामुळे त्याच्या अंगावर  माशा व इतर कीटक फिरत होते. यावेळी गुप्ते व धकाते  यांनी त्या वळूची  पाणी टाकून साफसफाई  केली आहे. 
गुप्ते यानी  ज्येष्ठ नागरिक संघामार्फत प्रशासनाला याबाबत पत्र दिले असून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई त्यावर झालेली नसल्यामुळे त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक प्रकाश फुलारी यांच्याबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे जाऊन तक्रार याबाबत तक्रार केली असता कॅन्टोन्मेंट प्रशासन अधिकार्‍यांनी त्यांना याबाबत आपल्याकडे  उपचारासाठी डॉक्टर व जिवंत वळू , जनावरे उचण्यासाठी सुविधां  नसल्याचे सांगितले.
बीपी मेरी डॉक्टर वजनावर करण्याची सुविधा नसल्याचे सांगितल्याने या आजारी  प्राण्यावर औषधोपचार कोण करणार  तसेच त्याच्या आजाराची  याची दखल कोण घेणार ? यासाठी कोणतीही  प्राणीमित्र संघटनेने पुढे यावे, असे स्थानिक रहिवासी नागरिकांना वाटते. परंतु कॅन्टोन्मेंट प्रशासनाने नकार दिल्यामुळे तेथील रहिवाशांना अशा प्राण्यांचे पुढे काय होणार याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे