Breaking News

बेलापूरमध्ये पोलिस पथकाचे संचालन

   बेलापूर/प्रतिनिधी

 विधानसभा निवडणूक २०१९ मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी बेलापूर मध्ये भारतीय सशस्त्र सीमा दलाचे संचलन श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट व सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले.

 निवडणूक मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट म्हणाले की शहरात मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्याबद्दलच्या संबंधित लोकांना नोटिसा पाठविल्या आहेत.आगामी निवडणूक मतदानाची प्रक्रिया शांततेत व निर्विग्न पार पडावी यासाठी आमचा पोलीसफोर्स दक्ष आहे, तरी नागरिकांना आवाहन की कुठल्याही दबावाला बळी न पडता निर्भय पणे मतदानाचा हक्क बजावावा, असेही ते म्हणाले. एसएसडी फोर्सच्या समवेत