Breaking News

डेटा सायंटिस्ट क्षेत्राची आगामी काळात भरभराट : पारगावकर

अहमदनगर/प्रतिनिधी
 “गेल्या काही वर्षात डेटा सायन्स बिग डेटा, मशीन लर्निंग, डिप लर्निंग सारख्या विषयांवर माध्यमात चर्चा झाली असून डेटाच्या आधारावर निर्णय घेणे हा डेटा सायंटिस्टचा मूळ उद्देश नसून त्याला सशक्त व्यावसायिक भावना देखील जोडलेल्या असतात. विखे अभियांत्रिकीत शिक्षक विकास कार्यक्रमांतर्गत डेटा सायन्स अ‍ॅण्ड मशीन लर्निंगवर ठेवलेल्या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार असून डेटा सायंटिस्ट क्षेत्राची आगामी काळात भरभराट होईल’’, असे प्रतिपादन ‘एल अ‍ॅण्ड टी’ चे जनरल मॅनेजर डॉ.अरविंद पारगावकर यांनी व्यक्त केला.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने डेटा सायन्स अ‍ॅण्ड मशीन लर्निंगवर सहा दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन पारगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 
या कार्यक्रमासाठी प्रमूख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्‍वस्त वसंतराव कापरे, सेक्रेटरी जनरल डॉ. बी. सदानंदा, डॉ.पी.एम.गायकवाड, सुनील कल्हापुरे व प्राचार्य डॉ. उदय नाईक आदी उपस्थित होते.
पारगावकर पुढे म्हणाले, “डेटा सायंटिस्टची नवीन पिढी मशीन लर्निंगवर अतिशय चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येत आहे. यामुळे स्ट्रार्टअप कंपन्यांना यामधून प्रेरणा मिळते. आजच्या युगात गणित सांख्यिकी, मशीन लर्निंग, डिप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, क्लाउड कॉम्प्युटींग व पायथॉन प्रोग्रामिंगचा जवळजवळ औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असून भविष्यातही याला मागणी असणार आहे.’’
प्रास्तविक माहिती तंत्रज्ञान विभागप्रमूख डॉ. दीपक विधाते यांनी केले. कार्यशाळेसाठी 50 प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. समन्वयक प्रा.ज्योती गायधनी यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच प्रा. मोनिका गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. श्रृती पोफळे यांनी कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन केले. यावेळी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.