Breaking News

चौरे यांच्या ‘विळखा’ कादंबरीचे आज प्रकाशन

अहमदनगर/प्रतिनिधी
 दशरथ चौरे लिखित व संस्कृती प्रकाशन, पुणे प्रकाशित ‘विळखा’ या कादंबरीचे प्रकाशन शनिवारी (दि.12) ज्येष्ठ साहित्यिक फ.मु.शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11.30 वाजता नगरमधील हॉटेल यश ग्रॅण्ड येथे होणार्‍या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव बावस्कर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, कार्यकारी अभियंता अर्जुन आंधळे, मसाप पारनरेचे अध्यक्ष दिनेश औटी, पतंजली योग समितीच्या मनीषा लोखंडे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन कवी भरत दौंडकर, अरूण वाळूंज करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दशरथ चौरे, अ‍ॅड.मीना चौरे, अ‍ॅड.लहू चौरे, अ‍ॅड.शहादेव नन्नवरे, अंकुश बाबा चौरे, हनमुंत सानप आदींनी केले आहे.